"माझ्याबद्दल खूप गैरसमज पसरवण्यात आले...", अजिंक्य देव यांनी सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाले-" लोकांना वाटलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:49 IST2025-11-15T12:44:14+5:302025-11-15T12:49:09+5:30
"लोकांना वाटलं...",अजिंक्य देव यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, म्हणाले-" माझ्याबद्दल गैरसमज..."

"माझ्याबद्दल खूप गैरसमज पसरवण्यात आले...", अजिंक्य देव यांनी सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाले-" लोकांना वाटलं..."
Ajinkya Deo: अभिनेत रमेश देव आणि सीम देव यांचे सुपूत्र अजिंक्य देव हे इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.'माहेरची साडी', 'सर्ज्या', 'जिवा सखा' अशा असंख्य चित्रपटांतून ते सिनेरसिकांच्या मनावर छाप उमटवण्यात यशस्वी झाले. लवकरच ते फराहन अख्तरच्या '१२० बहादुर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या ते एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत.त्यादरम्यान, इंडस्ट्रीत आपल्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले, त्यामुळे माझं नुकसान झालं. असं ते म्हणाले.
नुकतीच अजिंक्य देव यांनी 'अमोल परचुरें'च्या 'कॅचअप मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना कधी व्हॉइस ओव्हर, सिनेमाचं डबिंग यासाठी ऑफर्स आल्या का असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले,"मला कधी अशा ऑफर्स आल्या नाहीत. कारण, माझ्याबद्दल एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात झाला.माझे असे खूप चित्रपट हातून गेले. लोकांनी सांगितलं की, त्याचे थाटच खूप वेगळे आहेत.तो दुसऱ्या जगात असतो. माझ्याबद्दल खूप गैरसमज पसरवण्यात आले. बरेच जण मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं अरे, तुम्हालाच आम्ही घेणार होतो. पण, तुमच्याहबद्दल असं सांगण्यात आलं, मी त्यांना म्हटलं, फक्त एक फोन करायचा, मी कायम अॅव्हेलेबल असतो. "
यापुढे ते म्हणाले,"हा गैरसमज माझ्याबद्दल निर्माण झाला. शिवाय आई-बाबांचं वलय नेहमी मागं राहिलं, त्याच्यामध्ये अरे त्याला कसं विचारायचं असं झालं. या लोकांनी केलेल्या एका गैरसमजामुळे माझं नुकसान झालं. नको त्या गोष्टींमुळे हे सगळं घजलं.त्यामुळे मला अप्रोच केलं नाही. त्याच्यानंतर मग जे कोणी मला भेटले ते म्हणायचे तुम्ही मुळात जसं सांगितलं तसे नाहीच आहात. म्हटलं मी तसा मुळात नाहीच आहे.कारण, ते आमच्या रक्तातच नाही. माज हा शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही.खूप काही करता आलं असतं आणि मी ते करण्यासाठी तयार होतो.आपल्या इथे हीच समस्या आहे की कोणीतरी काही सांगतं आणि मग ते सगळीकडे पसरवलं जातं." असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला.