"चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका नाही, कारण...", अभिनेत्री उषा नाडकर्णींचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:15 IST2025-11-09T16:08:46+5:302025-11-09T16:15:23+5:30
लग्नानंतर उषा नाडकर्णींना सासऱ्यांनी दिलेला 'हा' सल्ला, म्हणाल्या-

"चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका नाही, कारण...", अभिनेत्री उषा नाडकर्णींचं वक्तव्य चर्चेत
Usha Nadkarni: अभिनेत्री उषा नाडकर्णी हे नाव मराठी सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं. गेली कित्येक वर्ष त्या चित्रपट, मालिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठीसह हिंदीतही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. उषा नाडकर्णी या अनेकदा त्यांची मतं, प्रतिक्रिया अगदी ठामपणे मांडताना दिसतात.दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सगळ्याचं लक्ष त्यांनी वेधलं आहे.
नुकताच उषा नाडकर्णी यांनी लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नानंतर तेव्हा काय परिस्थिती काय होती,याबद्दल सांगितलं. लग्नानंतर त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना एक सल्ला देखील दिला होता. तो किस्सा चाहत्यांसोबत शेअर करताना त्या म्हणाल्या, "मला भरलेलं घर असतं ना ते आवडतं.जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की आपण एकत्र राहूया. तेव्हा माझे चुलत सासरे होते. मी त्यांच्या घरात वाकोल्याला राहत होते. ते मला म्हणाले की नाही, विंगड विंगड राबते. म्हणजे वेगळे वेगळे राहा. त्याच्याने प्रेम राहत. एकत्र राहून मग त्याच्या बायकोनी शिकवलं, म्हणून याच्या बायकोनी सांगितलं, म्हणून हे ते ... असं परत भांडण होतात."
चार पुरुष एकत्र राहतात पण, बायका...
मग त्या म्हणाल्या,"ते माझे चुलत सासरे होते ... गेले ते आता... तेच मला म्हणाले. मग आता मला पण तेच वाटतं की एकत्र राहून राहून काहीतरी कुरघोड्या निघतातच. कारण चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका राहू शकत नाहीत. काहीतरी उंगली होतेच. मग भांडणनही होतात. मग एकमेकांची तोंड बघत नाही. त्यापेक्षा वेगळं राहावं प्रेमाने राहावं."
उषा नाडकर्णी सध्या ७९ वयाच्या आहेत. वयाच्या उत्तरार्धात त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहत नाही.त्यांनी स्वतंत्र जीवनशैली स्विकारली आहे.