Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:07 IST2022-05-30T16:06:15+5:302022-05-30T16:07:14+5:30
Shivani rangole and mrinal kulkarni: शिवानीने सासूबाईंसोबत म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे.

Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे (shivani rangole) हिने अलिकडेच अभिनेता विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. अगदी लग्नातील थीमपासून ते शिवानीच्या मंगळसूत्रापर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत आली. यामध्येच शिवानी आणि मृणाल (mrinal kulkarni)या सासू-सुनांच्या जोडीचीही चर्चा झाली. विशेष म्हणजे अलिकडेच या दोघींनी एक फोटोशूट केलं असून सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती वरचेवर तिचे फोटो वा व्हिडीओ शेअर करत असते. यात लग्नानंतर तिने विराजस आणि त्याच्या कुटुंबासोबत अनेक फोटो शेअर केले होते. मात्र, यावेळी तिने सासूबाईंसोबत म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे.
अलिकडेच शिवानी आणि मृणाल या दोघींनी एका साडीच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये मृणालने मरुन रंगाची साडी नेसली आहे. तर शिवानी ऑरेंज रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे या दोघी सासू-सुनांची जोडी नेटकऱ्यांना भलतीच आवडली असून अनेक जण त्यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.