समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:56 PM2022-05-05T13:56:47+5:302022-05-05T13:57:14+5:30

Sameera gujar: समीरा गुजर यांचा कलाविश्वातील वावर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, आता पुन्हा दमाने त्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत. 

marathi actress sameera gujar upcoming movie i am sorry Trailer out | समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

एकेकाळी उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समीरा गुजर. एक अभिनेत्री असण्यासोबतच त्या उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा त्यांची चर्चा रंगत असते. 'गाढवाचं लग्न' या चित्रपटाच राजकन्येची भूमिका साकारणाऱ्या समीरा गुजर यांचा कलाविश्वातील वावर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, आता पुन्हा दमाने ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत. 

आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. 'सॅारी' हा असाच एक शब्द आहे, जो आज अगदी आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. आता याच शब्दाला अनुसरून एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'आय एम सॅारी'... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.  या चित्रपटात समीरा गुजर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

येत्या १३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.एम. जे. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'आय एम सॅारी' या चित्रपटाची निर्मिती अब्दुल मजीद चिकटे यांनी केली आहे. यापूर्वी '३:५६ किल्लारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दीपक भागवत 'आय एम सॅारी' माध्यमातून पुन्हा एकदा काहीसा वेगळा जॅानर घेऊन आले आहेत.

दरम्यान, 'आय एम सॅारी' मध्ये काय पहायला मिळणार याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळत असल्यानं या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. "या चित्रपटाचं कथानक आपल्या दैनंदिन जीवनाशी मिळतंजुळतं असल्यानं प्रत्येक प्रेक्षकाला ते आपलंसं वाटेल", असं मत दिग्दर्शक दीपक भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

हे कलाकार झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

मयुरी कापडणे,रियाज मुलाणी, अनुराग शर्मा, नेहा तिवारी, राजन ताम्हाणे, समीरा गुजर, कौस्तुभ पाध्ये, श्रीकांत कामत, राजेश लाटकर, भगरे गुरुजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे, सुषमा सीनलकर, बाल कलाकार ओमकार जाधव, सानवी चव्हाण आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. 

Web Title: marathi actress sameera gujar upcoming movie i am sorry Trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.