भावाच्या लग्नात 'डोला रे डोला' गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, करवली बनून लुटली लाइमलाइट, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:13 IST2025-12-30T13:12:32+5:302025-12-30T13:13:01+5:30
भावाच्या लग्नात संगीत समारंभाला रितिकाने खास डान्सही केला. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

भावाच्या लग्नात 'डोला रे डोला' गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, करवली बनून लुटली लाइमलाइट, पाहा व्हिडीओ
सध्या सगळीकडे लग्नाचा माहौल आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीही गेल्या काही दिवसांत लग्नाच्या बेडीत अडकले. एका मराठी अभिनेत्रीच्या घरीही लगीनघाई सुरू होती. मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्रीच्या भावाचं नुकचं लग्न झालं. दादाच्या लग्नात रितिका करवली बनून मिरवली. लग्नाच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले होते. भावाच्या लग्नात संगीत समारंभाला रितिकाने खास डान्सही केला. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
भावाच्या संगीत सोहळ्यासाठी रितिकाने खास लूक केला होता. शिमरी साडी नेसून ग्लॅमरस लूकमध्ये ती तयार झाली होती. रितिकाने भावाच्या संगीत सोहळ्यात लाइमलाइट लुटली. संगीत सोहळ्यात तिने खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. डोला रे डोला गाण्यावर रितिकाने ठुमका लगावला. तिच्या डान्सने संगीत सोहळ्याला चार चांद लावले. रितिकाचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
रितिकाने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. टकाटक, मु.पो. बोंबिलवाडी, बॉइज ४, बॉइज, डार्लिंग, लंडन मिसळ या सिनेमांमध्ये ती दिसली होती. तर रेड २ या बॉलिवूड सिनेमातही रितिकाने छोटा रोल केला होता.