प्रार्थना बेहेरेच्या घरी झाली गणरायाची पहिली आरती, Video शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 09:18 AM2023-09-19T09:18:43+5:302023-09-19T10:25:10+5:30

सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा

marathi actress prarthana behere welcomes ganpati bappa at home did first arti | प्रार्थना बेहेरेच्या घरी झाली गणरायाची पहिली आरती, Video शेअर करत दाखवली झलक

प्रार्थना बेहेरेच्या घरी झाली गणरायाची पहिली आरती, Video शेअर करत दाखवली झलक

googlenewsNext

घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची, नैवेद्याची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी काल रात्रीचं गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर आज अनेकांच्या घरी सकाळीच बाप्पाची पहिली आरती झाली आहे. सेलिब्रिटी गणेशा मध्ये मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या (Prarthana Behere) घरीही गणरायाची पहिली आरती झाली. तिने व्हिडिओ पोस्ट करत याची झलकही दाखवली.

प्रार्थनाच्या घरी गणेश गुरुजींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाची छोटी मूर्ती विराजमान झाली. गणेश मूर्तीच्या सभोवताली फुलामाळांची आरास केलेली दिसत आहे. प्रार्थना छान पारंपारिक वेशात तयार होऊन नवऱ्यासोबत आरती करताना दिसत आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ तिने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.

अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणेशाचं आगमन झालं आहे. मुंबईतील घरीच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रार्थना बेहेरेची खास मैत्रिण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तर दरवर्षी घरीच गणेश मूर्ती घडवते. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटींच्या घरच्या गणपती बाप्पाचं खास वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे.

Web Title: marathi actress prarthana behere welcomes ganpati bappa at home did first arti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.