"ही फार दुर्दैवी गोष्ट...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल निवेदिता सराफ यांचं रोखठोक मत, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:43 IST2025-10-07T15:41:23+5:302025-10-07T15:43:02+5:30
फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल निवेदिता सराफ यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या...

"ही फार दुर्दैवी गोष्ट...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल निवेदिता सराफ यांचं रोखठोक मत, म्हणाल्या...
Nivedita Saraf: आजकाल सोशल मीडियाचा वापर करणारे लाखो-करोडो यूजर्स आहेत. या माध्यमाने प्रत्येक क्षेत्र व्यापून टाकलं आहे. त्यामुळे हल्ली सोशल मीडियावर किती ‘लाइक्स’, ‘शेयर्स’,‘कमेन्ट्स’ आणि ‘फॉलोअर्स’ आहेत याला फार महत्त्व आहे. मनोरंजन क्षेत्रात हा नवीन प्रकार आता डोकं वर काढत आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स बघून एखाद्या कलाकाराची भूमिकेसाठी निवड करणं, या प्रकाराबद्दल अनेकांनी उघडपणे भाष्य केलं आहे. त्यात आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांची या मुद्दावर आपलं मत मांडलं आहे.
नुकतीच निवेदिता सराफ यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान त्यांना आजची टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्री टॅलेंटपेक्षा ग्लॅमरला जास्त महत्त्व देते, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, "ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.हल्ली इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत हे बघून कास्टिंग केलं जातं. एखादा कलाकार उत्तम कलाकार असेल पण कदाचित तो इन्स्टाग्राम,फेसबुकवर तितका सक्रिय नसेल किंवा त्याला सोशल मीडियावर आपण काही पोस्ट करावं असं वाटत नसेल.पण, ही एक फार मोठी गल्लत निर्मात्यांकडून केली जाते, की सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत त्यावरून काम दिलं जातं. पण, ते सगळेजण कलाकार म्हणून यशस्वी होतील असं मला वाटत नाही." असं परखड मत निवेदिता सराफ यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, निवेदिता सराफ यांनी आजवर अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अलिकडेच त्या बिन लग्नाची गोष्ट चित्रपटात झळकल्या. या चित्रपटात उमेश कामत, प्रिया बापट आणि गिरीश ओक या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत.