"Views चे तुफान...पार केला...", अभिनेत्री मृक्ता बर्वेची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:49 PM2022-06-18T13:49:01+5:302022-06-18T13:52:48+5:30

Mukta Barve: उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानकाची निवड करणाऱ्या मुक्ताचा प्रत्येक चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जातो.

Marathi actress Mukta Barve's post viral on social media | "Views चे तुफान...पार केला...", अभिनेत्री मृक्ता बर्वेची 'ती' पोस्ट आली चर्चेत

"Views चे तुफान...पार केला...", अभिनेत्री मृक्ता बर्वेची 'ती' पोस्ट आली चर्चेत

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून कायम मुक्ता बर्वेकडे (Mukta Barve) पाहिलं जातं. उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानकाची निवड करणाऱ्या मुक्ताचा प्रत्येक चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जातो. त्यामुळे आजपर्यंत तिच्या अनेक चित्रपटांची दखल चित्रपट समिक्षकांनी वगैरे घेतली आहे. लवकरच मुक्ताचा वाय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुक्ताने 'वाय'  (Y) या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरने 2Million Viewsचा टप्पा पार केला आहे. यासंदर्भात तिने एक पोस्ट  सोशल मीडियावर लिहिली आहे. 'वाय' ट्रेलरला Views चे तुफान...पार केला 2Million Views चा टप्पा 'वाय' येतोय २४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर 'वाय' (Y) या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची मुख्य भूमिका आहे.  पोस्टरमध्य मुक्ता हातात मशाल घेऊन उभी असल्याचं पाहायला मिळालं. यावरून चित्रपटाचं कथानक काही तरी हटके असणार याचा अंदाज प्रेक्षकांना आला. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता वाढली. यामध्येच आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे.
 

Web Title: Marathi actress Mukta Barve's post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.