मराठी अभिनेत्री छाया कदमच्या आईचं निधन, म्हणाली, "अंगणातील चाफ्याच्या झाडात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:33 PM2023-08-17T16:33:47+5:302023-08-17T16:35:20+5:30

दोन आठवड्यांपूर्वी छाया कदम यांना मातृशोक झाला

Marathi actress Chhaya Kadam s mother passes away actress shared emotional post | मराठी अभिनेत्री छाया कदमच्या आईचं निधन, म्हणाली, "अंगणातील चाफ्याच्या झाडात..."

मराठी अभिनेत्री छाया कदमच्या आईचं निधन, म्हणाली, "अंगणातील चाफ्याच्या झाडात..."

googlenewsNext

मराठी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात. 'सैराट', 'न्यूड', 'रेडू', 'सरला एक कोटी',  'फँड्री',  'झुंड' अशा अनेक मराठी सिनेमातून त्यांनी अभिनयाची छाप सोडली आहे. अशा या प्रभावशाली अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २ आठवड्यांपूर्वी अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं. आज सोशल मीडियावर पोस्ट करत तिने भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

छाया कदम यांनी आईसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'आई आज दोन आठवडे झाले तुला जाऊन? नाही अगं, तू आहेस आणि असशील. कायमच माझ्यासोबत. तू असशील मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई आणि जात्यात. तू असशील गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडात. आणि तू असशील, तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्रात आणि माझ्या कामात.
मिस यू मम्मुडी. लव्ह यू मम्मुडी !'

छाया यांची ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे.एखाद्याच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपणं याहून वाईट ते काय. छाया यांनी अनेकदा आईसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्या आईच्या अत्यंत जवळ होत्या. आईच्या निधनाने अभिनेत्रीच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झाली आहे.

छाया कदम यांनी मराठीसोबतच 'सिंघमरिटर्न्स', अंधाधून' झुंड','गंगुबाई काठियावाडी' या हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक कामाचं कौतुक झालं आहे. रवी जाधवच्या 'न्यूड' सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखेने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. तर 'सैराट' सिनेमातही आपल्या छोट्याशाच भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

Web Title: Marathi actress Chhaya Kadam s mother passes away actress shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.