या अभिनेत्रीने बदलला तिचा लूक, ओळखणे देखील होतंय कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:59 IST2021-01-21T17:58:35+5:302021-01-21T17:59:51+5:30
या अभिनेत्रीने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या अभिनेत्रीने बदलला तिचा लूक, ओळखणे देखील होतंय कठीण
भार्गवी चिरमुलेने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये अतिशय साधी सून, पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती मालिकेत, चित्रपटांमध्ये आपल्याला भारतीय पेहरावात दिसते. पण तिने आता तिचा लूक बदलला असून या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्लॅक रंगाच्या टॉपमध्ये भार्गवी खूपच सुंदर दिसत आहे. तिने ब्लॅक रंगाचा चष्मा देखील घातला असून तिच्या गेटअपला तो सूट होत आहे. या फोटोसोबत नवीन गोष्टी ट्राय करण्याची मला सवयच आहे अशी तिने कॅप्शन लिहिली आहे. मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने भार्गवी चिरमुलेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीने वहिनीसाहेब, अनुबंध, पिंजरा, असंभव यांसारख्या अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. तसेच संदूक, इश्कवाला, नवरा माझा भवरा, गोळा बेरीज अशा अनेक मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. सिया के राम, स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.
भार्गवी या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. भार्गवी नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिच्या विविध फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. तिने काही दिवसांपूर्वी साडीत फोटोशूट केले होते. तिचे हे फोटोदेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले होते.