'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:19 AM2022-08-02T11:19:11+5:302022-08-02T11:19:49+5:30

Alka kubal: अलका कुबल यांचा Congratulations हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.  नुकताच या सिनेमाच्या सेटवर अलका ताईंचा सेंड ऑफ करण्यात आला.

marathi actress alka kubal maherchi sadi style send off last day film congratulations | 'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप'

'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप'

googlenewsNext

गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी कलाविश्वावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). 'माहेरची साडी', 'चार दिवस सासूचे', 'माहेरचा आहेर', 'लेक चालली सासरला'  अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे आज मराठी कलाविश्वात त्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतो. चित्रपटांसह मालिकांमध्येही त्या आज काल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे छोट्या पडद्यावरही त्यांचा चाहता वर्ग निर्माण होत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे छोटा पडदा आणि रुपेरी पडदा यांचा समतोल राखणाऱ्या अलका कुबल यांचा Congratulations हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.  नुकताच या सिनेमाच्या सेटवर अलका ताईंचा सेंड ऑफ करण्यात आला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अलका कुबल लंडनमध्ये Congratulations या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होत्या. या सिनेमातील त्यांचं शूट पूर्ण झालं असून संपूर्ण टीमने त्यांचा हटके अंदाजात सेंट ऑफ केला. यावेळी ‘सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी’ हे सिनेमातील गाणं लावून त्यांना निरोप देण्यात आला. हा व्हिडीओ चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता लोकेश गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी कॅप्शनमधून अलका ताईंसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे.

 “Send off to Everyone’s Fav Alka Tai @alkakubal_23 अलका ताई तुमच्या सोबत काम करुन एक वेगळेच समाधान मिळाले माझ्या संपूर्ण टीम ला ...खूप काही शिकायला मिळाले ...तुमची काम करण्याची पद्धत, एनर्जी, कामाप्रती असलेली तुमची श्रद्धा सगळेच Hatsoff खूप काम करायचे आहे तुमच्याबरोबर भविष्यात सुद्धा ...Thank you so much Alka tai for doing this film for me and my team… Love you Alka tai,” असं लोकेश गुप्ते म्हणाला.

दरम्यान, माहेरची साडी या गाजलेल्या चित्रपटानंतर अलका कुबल विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यावेळीदेखील Congratulations च्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते यांनी केलं आहे. तसंच या चित्रपटात अलका ताईंसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत हे कलाकार झळकणार आहेत.
 

Web Title: marathi actress alka kubal maherchi sadi style send off last day film congratulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.