मितालीला बिकिनी घालण्याचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची सिद्धार्थने घेतली फिरकी; म्हणाला, 'तुमचे अहो तुम्हाला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:59 AM2024-01-05T10:59:16+5:302024-01-05T10:59:41+5:30

Siddharth chandekar: मितालीला ट्रोल करणाऱ्या महिलेची सिद्धार्थने केली बोलती बंद

marathi actor siddharth chandekar reply who troll wife mitali mayekar | मितालीला बिकिनी घालण्याचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची सिद्धार्थने घेतली फिरकी; म्हणाला, 'तुमचे अहो तुम्हाला...'

मितालीला बिकिनी घालण्याचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची सिद्धार्थने घेतली फिरकी; म्हणाला, 'तुमचे अहो तुम्हाला...'

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकंच लाडक कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). हे दोघं नवरा-बायको असण्यापेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळेच त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेषकरुन आवडते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ही जोडी कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. इतकंच नाही तर ते कायम एकमेकांना सपोर्टही करतात. अलिकडेच एका युजरने मितालीला बिकिनी घालण्याचा सल्ला दिला. या युजरचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थने त्याला चांगलंच झापलं आहे. इतकंच नाही तर किमान शब्दांत त्याचा कमाल अपमानही केला आहे.

सिद्धार्थ आणि मितालीने आतापर्यंत अनेक ब्रँडचं प्रमोशन केलं आहे. यामध्ये नुकतंच त्यांनी Amazon Prime-one membership चा एक प्रमोशनल व्हिडीओ केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केल्या. मात्र, चक्क एका महिला युजरने मितालीला बिकिनी घालण्याता खोचक सल्ला दिला. या युजरची कमेंट वाचल्यावर सिद्धार्थने त्यांना त्यांच्याच शब्दांत उत्तर दिलं. विशेष म्हणजे त्यांचं उत्तर ऐकून अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, 'तुमचे अहो तुम्हाला काय म्हणतात ते इथे नका सांगू ताई', असं उत्तर सिद्धार्थने दिलं. त्याच्या या उत्तराची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर या कमेंटव्यतिरिक्त अन्य ट्रोलर्सलाही त्याने वेळोवेळी रिप्लाय देत बोलती बंद केली आहे.

सिद्धार्थ अलिकडेच 'झिम्मा 2' या सिनेमात दिसला होता. त्यानंतर लवकरच तो ओले ओले या सिनेमात झळकणार आहे.

Web Title: marathi actor siddharth chandekar reply who troll wife mitali mayekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.