"५ किलोची तलवार आणि ढाल घेऊन मावळे दिवसभर...", संतोष जुवेकरने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:27 PM2023-08-03T17:27:36+5:302023-08-03T17:32:48+5:30

"तालमीला सुरवात केली आणि पुढच्या २० मिनिटांत घामाच्या धारा...", संतोष जुवेकरच्या व्हिडिओने वेधलं लक्ष

marathi actor santosh juvekar shared video of talwar sword playing goes viral | "५ किलोची तलवार आणि ढाल घेऊन मावळे दिवसभर...", संतोष जुवेकरने शेअर केला व्हिडिओ

"५ किलोची तलवार आणि ढाल घेऊन मावळे दिवसभर...", संतोष जुवेकरने शेअर केला व्हिडिओ

googlenewsNext

'मोरया', 'झेंडा' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. त्याने अनेक चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. संतोषने अनेक ऐतिहासिक चित्रपटांतही काम केलं आहे. त्याने केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संतोषने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन तलवारबाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओत संतोष ढाल आणि तलवारीने सराव करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "तालमीला सुरवात केली आणि पुढच्या २० मिनिटांत दमून घामाच्या धारा सुरु झाल्या तेही लाकडाची तलवार आणि अगदीच तालमीसाठी वापरायची ढाल घेऊन...तेव्हा खरंच पुन्हा एकदा जाणीव झाली ती चार ते पाच किलोची तलवार आणि ती ढाल घेऊन माझे मावळे दिवस भर अगदी सूर्यास्तापर्यंत न थांबता तेवढ्याच ताकदीने कसे लढले असतील. नुस्ता विचार केला तरी थरकाप उडतो ओ," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी अतुल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, "हा चित्रपट..."

पुढे त्याने "आज जेव्हा तालमीला जातो तेव्हा ती लाकडी तलवार हातात घेतल्यावर जे काही वाटत असेल ते नाही शब्दात सांगू शकत ते अनुभवायलाच हवं. आपल्या राजाच्या आदेशावरून त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्यात आणि निधढ्या छातीनं आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढण्यात जी नशा आणि जी ताकत होती ती माझ्या त्या शिवरायांच्या मावळ्यालाच ठाऊक. धन्य ती जिजाऊ धन्य ते शिवराय आणि धन्य तो माझा प्रत्येक मर्द मराठा मावळा...त्रिवार मुजरा समद्यास्नी...ह्या माझ्या मावळ्यांच्या आशीर्वादानेच ह्या माझ्या मावळ्यांच्या चरणीं एक पुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय आशिर्वाद आणि साथ असूदेरे महाराजा," असंही म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरात राहतात सलीम खान, सावत्र आईबाबत अरबाज म्हणाला, "हेलन यांनी..."

संतोष 'रावरंभा' चित्रपटात ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने 'जालिंदर' ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'डेट भेट' चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसला. 'मायनस ३१' या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता. 

Web Title: marathi actor santosh juvekar shared video of talwar sword playing goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.