"दे धक्का'मध्ये समलैंगिक भूमिका साकारली पण...", संजय खापरेंनी व्यक्त केली खदखद; काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:39 IST2025-07-01T13:37:14+5:302025-07-01T13:39:14+5:30
"दे धक्का'मध्ये 'ती' भूमिका साकारली पण...", संजय खापरे काय म्हणाले?

"दे धक्का'मध्ये समलैंगिक भूमिका साकारली पण...", संजय खापरेंनी व्यक्त केली खदखद; काय म्हणाले?
Sanjay Khapre : संजय खापरे (Sanjay Khapre) हे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत. नेहमी विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे. 'दे धक्का', 'गाढवाचं लग्न', 'फक्त लढ म्हणा' तसेच 'डिस्को सन्या' यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अशातच दे धक्का या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सुंदऱ्यानावाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच भूमिकेबद्दल पहिल्यांदाच त्यांनी भाष्य केलं आहे. नुकतीच संजय खापरेंनी 'इट्ट्स मज्जा' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान ते 'दे धक्का' चित्रपटातील 'गे'च्या भूमिकेविषयी म्हणाले, "मला असं वाटतं आपण केलेलं कोणतंही काम फुकट जात नाही. ते बरोबर लोकांच्या लक्षात राहतं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की. आपण इथे किती रमायचं. टाईपकास्ट व्हायला खूप चान्सेस असतात. आपल्याकडे लोक हा विनोदी नट आहे, तर लगेच तसा स्टॅम्प मारतात."
त्यानंतर पुढे ते म्हणाले, "मला दे धक्का केल्यानंतर त्याच पद्धतीच्या अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. पण, माझ्यासाठी ती आव्हानात्मक भूमिका होती म्हणून मी ती केली. मला परत त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. तेव्हा माझ्याकडे प्लॅन बी तयार होता. मी डिझायनिंग करत होतो त्याच्यामध्ये रमत होतो. सांगायचा मुद्धा एवढाच कामाची गरज प्रत्येकाला असते. पण, उगाच काहीतरी करायचं आणि तिथे अडकून पडायचं आणि आयुष्यभरासाठी तो स्टॅम्प लावून घ्यायचा ते मला नको होतं." असं म्हणत संजय खापरेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.
‘दे धक्का’हा सिनेमा २००८ साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. एका क्रेझी कुटुंबाची कथा पाहताना प्रेक्षक बेभान झाले होते. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे आणि गौरी इंगवले असे बरेच कलाकार पाहायला मिळाले.