Engaged! प्रथमेश परबचा पार पडला साखरपुडा, 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 09:06 PM2024-02-14T21:06:39+5:302024-02-14T21:06:53+5:30

दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू! प्रथमेश परबचा पार पडला साखरपुडा

marathi actor prathamesh parab engaged with gf kshitija ghosalkar shared photo | Engaged! प्रथमेश परबचा पार पडला साखरपुडा, 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी नवी इनिंग

Engaged! प्रथमेश परबचा पार पडला साखरपुडा, 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी नवी इनिंग

गेल्या काही दिवसात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता प्रेक्षकांच्या लाडक्या दगडूनेही नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.  प्रथमेश परबने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर साखरपुडा केला आहे. प्रथमेशचा आणि क्षितीजा घोसाळकरचा साखरपुडा पार पडला आहे. प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

प्रथमेश परब हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. प्रथमेशच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. आता लवकरच प्रथमेश खऱ्या आयुष्यातील प्राजूबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत प्रथमेशने "आमचा व्हॅलेंटाइन डे..." असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

साखरपुड्यासाठी प्रथमेशने खास सूट परिधान केला होता. तर क्षितीजाने जांभळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. गुडघ्यावर बसत फिल्मी स्टाइलमध्ये प्रथमेशने क्षितीजाच्या हातात अंगठी घातली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रथमेश आणि क्षितीजा २४ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

'टाइमपास' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रथमेशने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. सोशल मीडियावरुन त्याने क्षितीजावरील प्रेमाची कबुली दिली होती. काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने लग्न करत आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: marathi actor prathamesh parab engaged with gf kshitija ghosalkar shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.