"पैसे नाहीत म्हणून बाहेर काढलं, रस्त्यावर झोपलो...प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातील तो प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:33 IST2022-07-23T15:51:58+5:302022-07-23T16:33:20+5:30

आज सुपरस्टार असणारा प्रसाद ओकला कधीकाळी रस्त्यावर झोपून दिवस काढायला लागत होते. इतक्या वर्षांनी अभिनेत्याने खुलासा केला आहे.

Marathi actor Prasad Oak recounts his tough journey | "पैसे नाहीत म्हणून बाहेर काढलं, रस्त्यावर झोपलो...प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातील तो प्रसंग

"पैसे नाहीत म्हणून बाहेर काढलं, रस्त्यावर झोपलो...प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातील तो प्रसंग

अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता. आज अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वतःचं स्थान निर्माण केलयं. नुकताच तो धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रसादनं साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. प्रसादच्या धर्मवीर या सिनेमातील भूमिकेचं खूपच कौतुक झालयं. पण प्रसादला ही कौतुकाची थाप प्रेक्षकांकडून मिळवण्यासाठी इतकी वर्ष बरीच मेहनतही करावी लागलीये. 

नुकतीच प्रसादने सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात हजेरी लावली होती.  यावेळी त्याला अभिनयक्षेत्रात काय मेहनत घ्यावी लागली याबाबत सांगिलतयं. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने त्याचं पूर्ण झालेलं स्वप्न ही त्यानं सांगितलयं. प्रसाद म्हणाला,'' मी पेंगेस्ट म्हणून राहायचो माझ्याकडे पैसे नव्हते भरायला म्हणून मला बाहेर काढण्यात आले होते. चित्रा टॉकिजच्या बाहेरील दुकानाच्या फळीवर मी झोपायचे. मला रस्त्यावर झोपायाला लागतं, फळीवर झोपायला लागतेय या पेक्षा या थिएटरच्या बाहेरील फळीळवर मी झोपतोय त्या थिएटरवर माझं पोस्टर कधी लागतंय याचा विचार मी करायचो.''

 

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमा हा सुपरडुपर हिट झाला. धर्मवीर सिनेमा रिलीज आधी, प्रमोशन दरम्यान तसेच रिलीजनंतर अनेक खास क्षण प्रसादने अनुभवले. रिलीजच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच धर्मवीर सिनेमाने त्यांचा पहिला वहिला पुरस्कार ही पटकवला. धर्मवीर सिनेमाला नुकताच शाहिर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान २०२२ हा पुरस्कार जाहिर झाला आहे. 

Web Title: Marathi actor Prasad Oak recounts his tough journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.