मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:46 PM2024-06-12T16:46:24+5:302024-06-12T16:46:46+5:30

काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेत्याने 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे.

marathi actor kshitish date dance on pushpa 2 allu arjun angaro sa song watch video | मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेता क्षितीश दाते यानेदेखील 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे. त्याचा अंगारो सा गाण्यावरील रील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत क्षितीशबरोबर अभिनेता निशाद भोईरदेखील दिसत आहे. निशाद आणि क्षितीशने मित्रांबरोबर समुद्रकिनारी हा रील व्हिडिओ बनवला आहे. त्यांचा हा भन्नाट डान्स प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

क्षितीश हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. लोकमान्य या मालिकेतील त्याने साकारलेली भूमिका विशेष गाजली. भाई व्यक्ती की वल्ली, नवरदेव बीएसी अग्रो, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव या सिनेमांमध्येही तो झळकला. धर्मवीर सिनेमात त्याने ऑनस्क्रीन एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. 

दरम्यान, २०२१ साली 'पुष्पा' हा दाक्षिणात्य सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. पुष्पाची स्टाइल आणि त्याचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  आता या सिनेमाचा स्वीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ ऑगस्टला 'पुष्पा २' प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: marathi actor kshitish date dance on pushpa 2 allu arjun angaro sa song watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.