Hardik Joshi : सर्वांचा लाडका ‘राणादा’ साकारणार ऐतिहासिक भूमिका, ‘हर हर महादेव’मध्ये झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:53 PM2022-10-09T17:53:29+5:302022-10-09T17:54:20+5:30

Har Har Mahadev : सर्वांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी लवकरच एका ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे. होय, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात हार्दिकची एन्ट्री झाली आहे.

marathi actor hardik joshi seen in subodh bhave film har har mahadev | Hardik Joshi : सर्वांचा लाडका ‘राणादा’ साकारणार ऐतिहासिक भूमिका, ‘हर हर महादेव’मध्ये झाली एन्ट्री

Hardik Joshi : सर्वांचा लाडका ‘राणादा’ साकारणार ऐतिहासिक भूमिका, ‘हर हर महादेव’मध्ये झाली एन्ट्री

googlenewsNext

सर्वांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी (Hardik Joshi) लवकरच एका ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे. होय, ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटात हार्दिकची एन्ट्री झाली आहे. ‘हर हर महादेव’ हा सिनेमा  दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या २५ ऑक्टोबरला  प्रदर्शित होणार होतोय. या चित्रपटात  अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या चित्रपटात हार्दिकही एका तगड्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो आबाजी विश्वनाथ यांची भूमिका जिवंत करणार आहे.

सुबोध भावे याने एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. ‘स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणजे आबाजी विश्वनाथ. त्यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते हार्दिक जोशी.स्वराज्याचा शिवमंत्र येत्या दिवाळीत संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार....,’ असं पोस्ट शेअर करताना सुबोधने लिहिलं आहे.

 ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर बाजीप्रभू यांच्या पत्नीच्या भूमिकेत   दिसणार आहे. तर अभिनेत्री सायली संजीव  महाराणी सईबाई यांची भूमिका साकारते आहे.  
 हार्दिकला सगळेच राणादा म्हणून ओळखतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिकने राणादाची भूमिका साकारली होती. याच मालिकेत त्याच्यासोबत अक्षया देवधर ही सुद्धा झळकली होती. ही ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे. अक्षया व हार्दिक लवकरच लग्न करणार आहेत.

Web Title: marathi actor hardik joshi seen in subodh bhave film har har mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.