आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:59 IST2025-01-10T09:49:32+5:302025-01-10T09:59:56+5:30

अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie new song out | आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Ek Radha Ek Meera New Song: प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर, म्युझिकल लव्ह स्टोरी. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' (Ek Radha Ek Meera) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी  (Gashmeer Mahajani) आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, नुकतंच 'एक राधा एक मीरा' मधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटातील 'जरा जरा मी झुरते...' हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. गाण्यातील गश्मीर-मृण्मयीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. 


सुप्रसिद्ध बॉलिवूड प्लेबॅकक सिंगर नीती मोहनच्या सुमधुर आवाजात सजलेलं 'जरा जरा मी झुरते'  हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. जितेंद्र जोशी यांची गीतरचना असलेल्या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिलं आहे. या सिनेमामध्ये गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडेसह सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आणि आरोह वेलणकर हे कलाकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, गश्मीर महाजनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच तो फुलवंती सिनेमात झळकला होता. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. शिवाय 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. तर मृण्मयी देशपांडे 'चंद्रमुखी', 'मन फकिरा', 'मिस यू मिस्टर', 'फतेशिकस्त', 'नटसम्राट', या चित्रपटांमध्ये दिसली.

Web Title: marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie new song out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.