...अन् भर मंचावर अशोक सराफ यांच्या डोळ्यात आलं पाणी; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 03:46 PM2023-09-13T15:46:03+5:302023-09-13T15:48:51+5:30

अशोक सराफ यांनी ‘झी मराठी’वरील ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या मंचावर हजेरी लावली.

Marathi Actor Ashok Saraf Shared Moment With Sa Re Ga Ma Pa Li'l Champs | ...अन् भर मंचावर अशोक सराफ यांच्या डोळ्यात आलं पाणी; व्हिडीओ व्हायरल

Ashok Saraf

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होतोय.  प्रेक्षकांचेही डोळे तो व्हिडिओ पाहून पाणावले आहेत. तो व्हिडीओ आहे मराठी सिनेसृष्टीची लाडके मामा अर्थात अशोक सराफ यांचा. या व्हिडीओमध्ये ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्स हे अशोक मामांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देताना दिसत आहेत.

येत्या एपिसोडमध्ये अशोक सराफ यांनी ‘झी मराठी’वरील ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या मंचावर हजेरी लावल्याचे पाहायला मिळणार आहे. यावेळी लिटिल चॅम्प्सनी लाडक्या अशोक मामांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली. छोट्या उस्तादांनी अशोक सराफ यांना सिंहासनावर बसवले.  फुलांचा वर्षावर करून त्यांचे आशीर्वाद घेतला. मुलांचे हे प्रेम पाहून अशोक सराफ यांचे डोळे पाणावले आणि ते निशब्द झाले.  त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रचंड भावनिक झालेलं बघायला मिळालं.


या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे की, "मामा आहेतच असे की त्यांचं कौतुक करेल तितकं कमी. माझी पण खूप इचछा आहे की 1 दिवस तरी आयुष्यातला मामांना भेटायचं. त्यांचं भरभरून प्रेम आत्मसात करायचं आणि आशीर्वाद तर मागायची गरज नाही त्यांना तो आपोआप मिळेल".

तर दुसऱ्या युजरने म्हटले की, अशोक सराफ या महान कलाकार ला शत शत नमन. तर एकाने म्हटलं की, "खूप चांगल उदाहरण आहे.....म्हणतात ना इथेच कर्याच आणि इथेच भोगायचे...हे फक्त वाईट हेतूने न घेता चांगल्या हेतूने पण घेता येत ते मामांनी दाखवलं....म्हणजेच काय त्यांनी आता पर्यंत प्रामाणिक पणे केल्या कमची पावती आज या स्वरुपात मिळता आहे...ग्रेट मामा".

अशोक सराफ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अशोक सराफ गेली अनेक वर्ष विविध माध्यमातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. यंदाच्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी अशोक सराफ हे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत.

Web Title: Marathi Actor Ashok Saraf Shared Moment With Sa Re Ga Ma Pa Li'l Champs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.