Ashok Saraf: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 22:51 IST2025-01-25T22:50:28+5:302025-01-25T22:51:45+5:30

Ashok Saraf :अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

marathi actor Ashok Saraf s first reaction after the Padma Shri announced | Ashok Saraf: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashok Saraf: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

संपूर्ण महाराष्टासाठी आनंदाची बाब ती म्हणजे मराठीतील विनोदवीर अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले आहे. अशोक सराफ यांना मिळणारा हा सम्मान संपूर्ण महाराष्ट्रवासियांना गर्व वाटेल असा आहे. 

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी 'एबीपी माझा' ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरश: उचंबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता संबंध भारताचा पुरस्कार मिळाला. हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे.  मी चांगलं काहीतरी करतोय यावर शिक्काच मिळाला आहे." 

Padma Awards 2025: मराठमोळ्या विनोदवीराचा 'राष्ट्रीय' सन्मान! अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर

यावेळी अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "हा एकट्या अशोकचा सन्मान नाही तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे. कारण त्यांनी नेहमीच अशोकवर, त्याच्या अभिनयावर प्रेम केलं. अशोकने नेहमी एकाग्रतेने, मेहनतीने अभिनय एके अभिनयच केला.  त्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची, जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा सर्व कुटुंबियांसाठी खूप आनंदाची बाब आहे."

Web Title: marathi actor Ashok Saraf s first reaction after the Padma Shri announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.