आवडली... घेतली! लोकप्रिय अभिनेता अक्षय टंकसाळेनं खरेदी केली नवी कोरी गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:47 AM2024-01-10T11:47:00+5:302024-01-10T11:56:47+5:30

लोकप्रिय अभिनेता अक्षय टंकसाळेनं नवी कोरी गाडी खरेदी केली.

marathi actor akshay tanksale bought new car on his birthday | आवडली... घेतली! लोकप्रिय अभिनेता अक्षय टंकसाळेनं खरेदी केली नवी कोरी गाडी

आवडली... घेतली! लोकप्रिय अभिनेता अक्षय टंकसाळेनं खरेदी केली नवी कोरी गाडी

अक्षय टंकसाळे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. अक्षय टंकसाळे अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गंभीर आणि विनोदी भुमिका साकारत अक्षयने स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. संवेदनशील विषयही रंजकपणे तो पडद्यावर पार पाडतो.  अशातच अक्षय टंकसाळे त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीय. अक्षयने नवीन वर्षात नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. 

अक्षयने नवीन गाडीचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अक्षयने ही महागडी गाडी खरेदी केली आहे. पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'माझ्याकडून मलाच वाढदिवसाची भेट. आवडली, घेतली.तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. जय गणेश'. शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ऐटीत त्याच्या गाडीजवळ उभा असल्याचे दिसून येत आहे.

अक्षयच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते आणि सेलेब्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेता अमेय वाघच्या कमेंटने. त्याने लिहलं, 'आता वैशाली ची कॉफी car मध्ये full AC लावून!'. तसेच अभिनेता अभिजित खांडेकर, पार्थ भालेराव, सिद्धार्थ मेनन, पर्ण पेठे, आणि रितिका श्रोत्री यांनीही अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘बस्ता’, ‘सातारचा सलमान’, ‘आंबट शौकीन’, ‘जीएफबीएफ’ आणि ‘मूषक’ या चित्रपटांमध्ये हटके भूमिकेत दिसला. तर पोस्टर गर्ल या चित्रपटात अक्षयने केलेली भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. यानंतर तो 'चौक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर अलीकडेच तो 'पिल्लू बॅचलर' या चित्रपटात दिसला होता. आता तो कोणत्या भुमिकेतून पुन्हा भेटीला येतो, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 

 

Web Title: marathi actor akshay tanksale bought new car on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.