Video: अभिनयासह स्वयंपाक करण्यातही आकाश आहे एक्स्पर्ट ; रानात केली बटाटा भजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:03 AM2023-07-30T11:03:24+5:302023-07-30T11:04:05+5:30

Akash Thosar: धबधब्याजवळ आकाशने मारला बटाटा भजीवर ताव; व्हिडीओ होतोय व्हायरल

marathi actor Aakash is good at cooking video viral on social media | Video: अभिनयासह स्वयंपाक करण्यातही आकाश आहे एक्स्पर्ट ; रानात केली बटाटा भजी

Video: अभिनयासह स्वयंपाक करण्यातही आकाश आहे एक्स्पर्ट ; रानात केली बटाटा भजी

googlenewsNext

रांगड्या मातीत लहानाचा मोठा झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर(Akash Thosar). कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या आकाशने सैराटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. त्यामुळे आज लोकप्रिय मराठमोळा अभिनेता म्हणून आकाशकडे पाहिलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये आकाशमध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतो. यात सध्या आकाशने बिझी शेड्युलमधून वेळ काढत तो पावसाळी ट्रेकसाठी गेला आहे. येथील अनेक भन्नाट व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी आकाशने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो खळखळत्या धबधब्यावर रॅपलिंग करत होता. त्यानंतर त्याने आता आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो धबधब्याजवळ बसून चक्क बटाटा भजी करत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त आकाशकडे पाककलेचंही कौशल्य आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये आकाश बटाटा भजी करत आहे. त्याच्यासोबत त्याचे अन्य सहकारीदेखील दिसून येत आहेत. आकाश सध्या सह्याद्री पर्वत रांगेत पावसाळी ट्रेकचा आनंद घेत आहे. आकाश लवकरच रवी जाधव यांच्या आगामी 'बाल शिवाजी' सिनेमात दिसणार आहे. 
 

Web Title: marathi actor Aakash is good at cooking video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.