मनवा नाईक अन् सुशांत तुंगारेचे शुभमंगल सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 21:41 IST2017-03-18T16:11:17+5:302017-03-18T21:41:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम असलेल्या अभिनेत्री मनवा नाईक हिच्या लग्नाचा अखेर बार उडवून देण्यात आला आहे. निर्माता सुशांत ...

Manwa Naik and Sushant Tungare Shubhamangal careful! | मनवा नाईक अन् सुशांत तुंगारेचे शुभमंगल सावधान!

मनवा नाईक अन् सुशांत तुंगारेचे शुभमंगल सावधान!

ल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम असलेल्या अभिनेत्री मनवा नाईक हिच्या लग्नाचा अखेर बार उडवून देण्यात आला आहे. निर्माता सुशांत तुंगारे आणि मनवाचे अतिशय धुमधडाक्यात शुभमंगल पार पडले आहे. खरं तर सध्या मराठी इंडस्ट्रीत जणू काही लग्नाचा मोसमच सुरू आहे. मयुरी वाघ, मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे यांच्यानंतर आता मनवाने लग्नाचे सात फेरे घेत संसाराला सुरुवात केली आहे. 



मनवाच्या या गोड बातमीचे काही प्रसंग तिची मैत्रीण अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चित्रपटातून अभिनय करणाºया मनवाने नुकतेच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेची तिने सुशांत तुंगारेसह निर्मिती केली आहे. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्माता असून, त्याने मालिकांची निर्मिती केली आहे. 



दरम्यान, मनवा आणि सुशांत यांना त्यांच्या सुखी संसारासाठी ‘सीएनएक्स’कडून भरपूर शुभेच्छा!

Web Title: Manwa Naik and Sushant Tungare Shubhamangal careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.