मनवा नाईक बनली कॅमेरामॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 12:34 IST2016-06-11T07:04:20+5:302016-06-11T12:34:20+5:30
मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री मनवा नाईक हिने क्षणभर विश्रांती, शासन, दम असेल तर या अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने ...

मनवा नाईक बनली कॅमेरामॅन
म ाठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री मनवा नाईक हिने क्षणभर विश्रांती, शासन, दम असेल तर या अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण आता ती, तिचा आगामी चित्रपट पिंडदान या चित्रपटात एका हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिने या चित्रपटात कॅमेरामॅनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती लंडन मधील एका अग्रगण्य चॅनेल ची कॅमेरामेन दाखविण्यात आली आहे. तसेच पिंडदानविषयी डॉक्युमेंट्री करण्यासाठी ती भारतात येते. आणि ही डॉक्युमेंट्री ती सिद्धार्थ चांदेकर सोबत तयार करते. त्या दरम्यान त्या दोघांमध्ये काय घडते?, अनुभव,तो प्रवास या चित्रपटातून १७ जून रोजी उलगणार आहे. तसेच या चित्रपटात माझे मन तुझे झाले या गाण्यातूनदेखील या दोघांची जवळीकता दाखविण्यात आली आहे. पण यामध्ये पॉला मॉकग्लिन ही परदेशी अभिनेत्री देखील झळकणार आहे. आता या तिघांमध्ये नक्की काय केमस्ट्री असणार आहे. ते पाहण्यासाठी थोडे दिवस आणखी वाट पाहूयात.