मांजरेकर बनणार 'इनामदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:39 IST2016-01-16T01:07:22+5:302016-02-10T09:39:37+5:30

टीएलव्ही प्रसाद दिग्दर्शित वृंदावन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या चित्रपटातील भारत गणेशपुरे यांच्या डेलीकुमार या पात्राची ...

Manjrekar to become 'Inamdar' | मांजरेकर बनणार 'इनामदार'

मांजरेकर बनणार 'इनामदार'

एलव्ही प्रसाद दिग्दर्शित वृंदावन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या चित्रपटातील भारत गणेशपुरे यांच्या डेलीकुमार या पात्राची ओळख करून देण्यात आली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक, कलाकार, लेखक अशा अनेक बिरुदावल्या असलेल्या महेश मांजरेकरांचे पात्र रिलीज करण्यात आले आहे.
ते या चित्रपटात भानुप्रताप इनामदारांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यासाठी इनामदारांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ! या त्यांच्या वाक्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चलती सुरू आहे. यामध्ये आपल्याला दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परशुरामी, महेश मांजरेकर, अशोक सराफ, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, आरती सोळंकी, कुमार हेडगे आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. राज प्रेमी, सुनील खांडपूर आणि संदीप शर्मा चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

Web Title: Manjrekar to become 'Inamdar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.