देवदासमधून मंगेशचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 18:24 IST2016-11-04T18:36:42+5:302016-11-07T18:24:39+5:30
देवदास या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. देवदास या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता ...
(18).jpg)
देवदासमधून मंगेशचा पत्ता कट
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> देवदास या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. देवदास या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता मंगेश देसाई असणार होता. मात्र आता मंगेशला या चित्रपटातून वगळण्यात आल्याचे समोर आलंय. देवदास या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋतुराज धलगुडेने लोकमत सीएनएक्सशी बोलताना ही माहिती दिली. निर्मात्यांना मंगेश हा देवदासच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. मंगेशचा 'एक अलबेला' हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलाय. त्यामुळे प्रेक्षक त्याला देवदासमध्ये स्वीकारतील की नाही अशी भीती निर्मात्यांना होती. म्हणूनच त्यांनी मंगेशला या चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऋतुराज यांनी सांगितले. देवदासचा हा चित्रपट माझ्यासाठी फार महत्त्वकांक्षी आहे. आज देवदास अनेक भाषांमध्ये तयार झाला आहे. प्रेक्षकांनी दिलीप कुमार आणि शाहरुख खानला देवदासच्या भूमिकांमध्ये पाहिले होते. त्यामुळे मराठीत देखील देवदास करताना आम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज होती. देवदास हा चित्रपट करायचा तर तो भव्य दिव्य स्वरुपातच आणि प्रेक्षकांना अपील होईल असाच करायचा. हे मी आधीच ठरविले होते. पण जर प्रेक्षकांनीच देवदासच्या भूमिकेत मंगेशला स्वीकारले नाही तर एवढी मेहनत घेऊन काहीच फायदा होणार नाही. कोणताही चित्रपट तयार होण्यासाठी निर्माता हा महत्त्वाचा असतो. निर्मात्यांच्या निर्णयापुढे मी जाऊ शकत नाही. याबाबत मी मंगेशला कळविले आहे. आम्ही या चित्रपटासाठी आता देवदासच्या, पारो आणि चंद्रमुखीच्या शोधात आहोत. लवकरच या सर्व पात्रांची घोषणा करण्यात येईल असे दिग्दर्शक ऋतुराज यांनी सांगितले आहे.