मानसी नाईक, जॉनी लिव्हर आणि सिध्देश पै देणार सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 17:44 IST2017-01-19T17:44:29+5:302017-01-19T17:44:29+5:30
आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक लवकरच एका आगामी अल्बममध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे तिच्या ...
.jpg)
मानसी नाईक, जॉनी लिव्हर आणि सिध्देश पै देणार सरप्राईज
आ ल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक लवकरच एका आगामी अल्बममध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे तिच्या या अल्बममध्ये तिच्यासोबत थिरकताना प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता जॉनी लिव्हर दिसणार आहे. त्यामुळे हे प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज असणार आहे. हे दोघे मला लगीन कराचयं या गाण्यावर कल्ला करणार असल्याचे अभिनेत्री मानसी नाईक हिने लोकमत सीएनएक्सला सांगितले. या अल्बमविषयी मानसी सांगते, बाई वाडयावर या... या गाण्यानंतर आता मला लगीन कराचयं आहे या गाण्यावर धमाल करण्यासाठी सज्ज व्हा. हे गाणे खरचं खूपच छान आहे. बाई वाडयावर या हयानंतर आता मला लगीन कराचयं या गाण्यावर आता प्रेक्षकांनी थिरकण्यास तयार व्हा असेदेखील मानसी यावेळी म्हणाली. तसेच बॉलिवुडच्या या कॉमेडी किंगसोबत नृत्य करण्यास मिळणार असल्याने मी खूपच आनंदित झाले आहे. या गाण्याचे चित्रिकरण नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असणार आहे. विशेष म्हणजे आमच्या दोघांसोबत नृत्याचा आणखी एक बादशाह प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे. तो म्हणजे सिध्देश पै. या कलाकाराने आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिध्देशची ही आयडिया असून त्यानेच हे गाणे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफ केले आहे. तर संगीत स्वरूप भालवणकर यांनी दिले आहेत. नुकतेच मानसीचे बाई वाडयावर या.. या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. लग्न असो या पार्टी सवर् ठिकाणी हेच गाणे वाजताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या गाण्यानंतर मानसी नाईक ही मला लगीन कराचयं या गाण्यावर नृत्य करण्यास सज्ज झाली आहे.