मकरंद अनासपुरे यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:06 IST2017-02-28T05:36:21+5:302017-02-28T11:06:21+5:30

नाम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत समाजासमोर एक आदर्श ...

Makrand Anaspure's reputation | मकरंद अनासपुरे यांची खंत

मकरंद अनासपुरे यांची खंत

म या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. नुकताच या कार्यासाठी या कलाकारांच्या नाम संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनकडून अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नाम फाउंडेशनला आणि व्यक्तिगत पातळीवरील पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राजेश काची यांना देण्यात आला आहे. 
 
        या पुरस्करादरम्यान मकरंद अनासपुरे सांगतात, मी भारतीय माणूस असून अलीकडे इंडियात राहतो. पण मला भारताच्या समस्या समजतात. महासत्तेच्या गोष्टी करत असताना व्यवस्थेत विपर्यास आहे. देदीप्यमान इतिहास असणाºया भारत देशाचा वर्तमान केविलवाणा कसा अशी त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच  शेतकरी ते ग्राहक यांमधील अडथळे नाहिसे झाले तरच शेतकºयांना मदत होईल. पुढील महिन्यात शहीद जवानांच्या कुटुंबाकरिता मोठा कार्यक्रम नामकडून घेण्यात येणार आहे. आपण केवळ इतिहासातच रमतो. देशात पूर्वी कधी तरी सोन्याचा धूर निघायचा. आता व्यसनांचा धूर निघतो हे मात्र आपण सांगत नाही; याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 
     
           मकरंद अनासपुरे यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनदेखील जिंकले आहे. आतापर्यत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक से एक चित्रपट दिले आहेत. यामध्ये नागपूर आधिवेशन, रंगापंतगा, कापूस कोंडयाची गोष्ट, दे धक्का, सावरखेड एक गाव असे अनेक सुपरहीट चित्रपट त्यांची नावी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Makrand Anaspure's reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.