चांगला दिग्दर्शक-लेखक म्हणून नाव कमवायचेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:49 IST2016-12-31T16:49:12+5:302016-12-31T16:49:12+5:30
अभिनेता ऋषीकेश जोशीने त्याच्या बहारदार अभिनयाने आणि अफलातून विनोदशैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ऋषीकेशच्या दर्जेदार ...
.jpg)
चांगला दिग्दर्शक-लेखक म्हणून नाव कमवायचेय
भिनेता ऋषीकेश जोशीने त्याच्या बहारदार अभिनयाने आणि अफलातून विनोदशैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ऋषीकेशच्या दर्जेदार अभिनयाच अनुभूती येतेच. आता ऋषीकेश सांगतांयत त्यांना चित्रपटसृष्टीत एक चांगला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नाव कमवायचे आहे. ऋषीकेश नवीन वर्षात एक धमाकेदार चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी ते फारच उत्सुक आसल्याचे समजतेय. आता या चित्रपटात नेमक्या कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे हे आपल्याला लवकरच समजेल. परंतू नुकताच त्यांनी त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत सांगितले आहे. नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे, त्यामुळे ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी देखील सुरु झाली आहे. नववर्षाच्या लेट नाईट पाट्यार्ना देखील आता उत येईल. अशावेळी योग्य ते भान ठेवून नववषार्चा आनंद उपभोगा, असा संदेश मी आजच्या पिढीला देतो. जे कराल ते लक्षपूर्वक आणि काळजी घेऊन करा, जेणेकरून त्यात तुम्हाला यश मिळेल. नवीन वर्षात माझे देखील काही प्लॅन्स आहेत. तरी, नवीन वर्षाच्या आनंदात जुन्याला विसरून चालत नाही. यंदाचे माझे वर्ष संमिश्र असे गेले. अनेक नवे मित्र यावर्षी मला मिळाले. त्यातलाच एक रितेश देशमुख. एका कार्यक्रमाच्या शुटींगच्या निमित्ताने माझा रितेशशी संपर्क आला. तो एक चांगला माणूस असून, आम्ही चांगले मित्र बनलो आहोत. पुढील वर्षी देखील अशीच नव्या लोकांशी भेटीगाठी वाढत राहो, अशी माझी इच्छा आहे. ऋषीकेशचा हा संकल्प नक्कीच पूर्ण हावो अशी प्रार्थना त्याचे चाहते तर करतीलच.