हा साऊथमधला कलाकार करतोय मराठीत पदार्पण..जाणून घ्या आमच्यसोबत कोण आहे तो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 16:01 IST2016-11-15T15:56:56+5:302016-11-15T16:01:41+5:30

मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेली आहे यात शंकाच नाही. कारण बॉलिवूड कलाकारदोखील एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटसृष्टीकडे पाउले टाकताना ...

This is the main artist in Marathi. Learn about the debut in Marathi. Who is with us? | हा साऊथमधला कलाकार करतोय मराठीत पदार्पण..जाणून घ्या आमच्यसोबत कोण आहे तो

हा साऊथमधला कलाकार करतोय मराठीत पदार्पण..जाणून घ्या आमच्यसोबत कोण आहे तो

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेली आहे यात शंकाच नाही. कारण बॉलिवूड कलाकारदोखील एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटसृष्टीकडे पाउले टाकताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचे रिमेकदेखील येणार असल्याचे समजत आहेत. एवढेच नाही तर, बॉलिवूडच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठीदेखील मराठी मालिकांना पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना, बॉलिवूडनंतर दाक्षिणात्य कलाकारांनादेखील मराठी इंडस्ट्रीची भुरळ पडलेली पाहायला मिळत आहे. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकार अभिनेता अनुपमसिंग ठाकूरदेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करणार आहे. तो मिलिंद गवळी दिग्दर्शित आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर त्याने या चित्रपटाला आवाजदेखील दिला आहे. त्याने या चित्रपटात धिन धिन धाना हे गाणंदेखील गायलं आहे. संगीतकार बबली हक यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. पण अदयाप ही या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक मिलिंद गवळी यांनी यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत अथांग नावाचा चित्रपट केला आहे. तर अभिनेता अनुप सिंगने यापूर्वी महाभारत, कहानी चंद्रकांता की अशा अनेक मालिकेत काम केले आहे. आता तो आगामी सिंघम ३ आणि दाक्षिणात्य चित्रपटातील मोठा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटादेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. तसेच मूळचा पायलट असलेल्या अनुप सिंगनं वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह मि. वर्ल्ड हा किताबही पटकावला होता. अशा या दाक्षिणात्य अभिनेत्याचा मराठी चित्रपटसृष्टीत डबल धमाका पाहायला मिळणार आहे.

Web Title: This is the main artist in Marathi. Learn about the debut in Marathi. Who is with us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.