महेश मांजरेकर-रेणुका शहाणे 'देवमाणूस'मधून प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:06 IST2025-01-15T16:06:35+5:302025-01-15T16:06:54+5:30

'देवमाणूस' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Mahesh Manjrekar Renuka Shahane subodh bhave multistarrer devmanus movie to release on 25 april | महेश मांजरेकर-रेणुका शहाणे 'देवमाणूस'मधून प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

महेश मांजरेकर-रेणुका शहाणे 'देवमाणूस'मधून प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

नव्या वर्षात अनेक नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच 'देवमाणूस' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा बहुप्रतिक्षीत सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर त्यांच्यासोबत सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 

'देवमाणूस' हा नव्या वर्षातील बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे. तेजस देऊस्कर यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तर 'तू झुठी मैं मकार', 'दे दे प्यार दे', 'मलंग', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'वध' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे लव फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.



 
'देवमाणूस'बद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थसारखे उत्तम कलाकार यात आहेत. ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे”.

Web Title: Mahesh Manjrekar Renuka Shahane subodh bhave multistarrer devmanus movie to release on 25 april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.