"'जवान'मध्ये माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी", महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:00 PM2023-10-17T13:00:55+5:302023-10-17T13:01:28+5:30

'जवान' चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी केल्याचा दावा प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केला आहे. 

mahesh manjarekar said jawan climax copy from me shivajiraje bhosale boltoy movie | "'जवान'मध्ये माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी", महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात..."

"'जवान'मध्ये माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी", महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात..."

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. आजही शाहरुखचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. 'जवान'मधून देशातील राजकारण आणि इतर समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्सही मोठा रोमांचक आहे. पण, 'जवान' चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी केल्याचा दावा प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केला आहे. 

महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी 'जवान' चित्रपटाचा क्लायमॅक्स त्यांच्या मी शिवाजीराजे बोलतोय चित्रपटातून कॉपी केला असल्याचा दावा केला आहे. "मला वाटतं प्रत्येक नागरिकाने राजकीयदृष्ट्या जागरुक राहणं गरजेचं आहे. पाच वर्षातून एकदा आपण वोट देऊन मोकळे होते. त्याचे परिणाम आपण पाच वर्ष भोगत असतो. सगळे म्हणतात राजकारण आपल्याला काय करायचंय, पण तुम्ही ते जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आपण सगळेच राजकीय नेत्यांना नाव ठेवतो. पण, आपणच ते निवडूण दिले आहेत. मग, नंतर आपण त्यांना नावं कशी काय ठेवतो?", असं ते 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

"'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट केलेला तेव्हा त्याचा क्लायमॅक्सही असाच होता. 'जवान'मध्ये पण तसाच क्लायमॅक्स केल्याचं मी ऐकलं. त्यांनी सेम टू सेम क्लायमॅक्स उचलून लावला आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'मध्ये सचिनचं स्पीच आहे ते जसच्या तसं त्यांनी जवानमध्ये वापरलं आहे. मी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. पण, मला असं अनेक जणांनी सांगतिलं. पण, मला हे चांगलं वाटलं. कारण, ते गरजेचं आहे. एक कुठल्यातरी मुख्यमंत्र्याने सांगावं की आरोग्यमंत्री हा डॉक्टर असावा," असं म्हणत त्यांनी जवान चित्रपटाने क्लायमॅक्स कॉपी केल्याबाबत वक्तव्य केलं आहे. 

दरम्यान, 'जवान' चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ६३६ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ११३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, दीपिका पदुकोण, गिरीजा ओक, सान्या मल्होत्रा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
 

Web Title: mahesh manjarekar said jawan climax copy from me shivajiraje bhosale boltoy movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.