७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
By कोमल खांबे | Updated: October 31, 2025 11:15 IST2025-10-31T11:15:28+5:302025-10-31T11:15:53+5:30
मराठीतील हा बिग बजेट सिनेमा असल्याचं महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी कितीतरी कोटी खर्च झाल्याचा खुलासाही मांजरेकरांनी केला आहे.

७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
महेश मांजरेकरांचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. सिनेमात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर त्रिशा ठोसर, पृथ्विक प्रताप, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठीतील हा बिग बजेट सिनेमा असल्याचं महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी कितीतरी कोटी खर्च झाल्याचा खुलासाही मांजरेकरांनी केला आहे.
महेश मांजरेकरांनी 'कॅच अप' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी सिनेमा रिलीज होण्याआधी किती टेन्शन असतं, याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "आई सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा मला अजिबातच टेन्शन नव्हतं. मला फ्लॉप वगैरे काही माहितच नव्हतं. पण पैसा एकूण एक माझा होता. त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन असतं. तुम्ही पैसे टाकलेले असतात त्यामुळे तुम्हाला जबाबदारीचं भान असतं. सिनेमा रिलीजच्या आधी प्रेशर हे असतंच".
याच मुलाखतीत महेश मांजरेकरांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या बजेटबद्दल खुलासा केला. "हा सिनेमा साडेसात-आठ कोटीत होईल असं वाटलं होतं. पण, हा सिनेमा होईपर्यंत साधारण सिनेमाचं बजेट हे १३ कोटींचं झालं. त्यामुळे हा मराठीतील बिग बजेट सिनेमा आपण म्हणू शकतो. शिवाजी महाराजांचा आणि त्याच्याबरोबर असलेला आणखी एक घोडा असे दोन घोडे शूटिंगला होते. त्या घोड्यांचंच बिल हे १९ लाख रुपये झालं. म्हणजे मला नवीन चार घोडे घेता आले असते. पण, हे प्रेशर माझ्यावर नव्हतं. हे प्रेशर प्रोड्युसरसाठी आहे. कारण इतके चांगले प्रोड्युसर शोधून पण मिळणार नाहीत. मी कधी त्यांना फोन वगैरे केला तर तेच मला म्हणायचे की काय प्रेशर वगैरे घेऊ नको. मस्त होणार आहे", असं ते म्हणाले.
