अलका कुबल यांच्या लग्नाला होता कुटुंबाचा विरोध; 'या' कारणामुळे आईला पसंत नव्हता जावई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:09 PM2024-06-21T16:09:58+5:302024-06-21T16:10:52+5:30

Alka kubal:'माहेरची साडी' हा सिनेमा सुपरहिट ठरत असतांनाच अलका कुबल यांनी सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या ७ ते ८ महिन्यांमध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांच्या लग्नाचा हा प्रवास सोपा नव्हता.

maherchi sadi fame marathi-actress-alka-kubal- and sameer athlaye filmy-lovestory | अलका कुबल यांच्या लग्नाला होता कुटुंबाचा विरोध; 'या' कारणामुळे आईला पसंत नव्हता जावई

अलका कुबल यांच्या लग्नाला होता कुटुंबाचा विरोध; 'या' कारणामुळे आईला पसंत नव्हता जावई

आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे आणि लोभसवाण्या चेहऱ्यामुळे प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). गेल्या कित्येक वर्षांपासून अलका कुबल मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, त्यांना खरी ओळख मिळाली ती माहेरची साडी या सिनेमातून. या सिनेमामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची आदर्श, सोशिक सून अशी इमेज तयार झाली. परंतु, खऱ्या आयुष्यात त्या प्रचंड धडाडीच्या, आत्मविश्वासू आणि कणखर आहेत. त्यांचा हा स्वभाव बऱ्याचदा त्यांच्या निर्णयांमधून दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली. इतकंच नाही तर आईचा विरोध असतानाही त्यांनी समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. 

'माहेरची साडी' हा सिनेमा सुपरहिट ठरत असतांनाच अलका कुबल यांनी सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या ७ ते ८ महिन्यांमध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांच्या लग्नाचा हा प्रवास सोपा नव्हता. कारण, अलका यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता. 

"मी आणि समीरने बरेच सिनेमे एकत्र केले होते. मी पडद्यावर आणि तो पडद्यामागे असं सुरु होतं. खूप सिनेमा एकत्र केल्यानंतर मला तो आवडू लागला होता. त्यात आमचा मित्रमंडळींचा एक ग्रुपही होता. त्यामुळे एकत्र बाहेर फिरायला जाणं वगैरे सुरु होतो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तरी समीरने मला काही प्रपोज केलं नव्हतं. शेवटी 'तू याच्यासोबत फिरतेस मग लग्नाचं कसं काय?' असं मला घरातून विचारलं जाऊ लागलं. त्यामुळे 'आपण लग्न कधी करायचं?', असं मी समीरला विचारलं. त्यानंतर मग समीरने त्याच्या घरी सांगितलं", असं अलका कुबल म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "दोघांच्या घरी सांगून झाल्यानंतर दोघांचे घरचे एकमेकांच्या कुटुंबियांना भेटले. पण, माझ्या आईचा लग्नाला विरोध होता. मुळात, एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिचा नकार होता. पण, इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्यामुळे कोणाला कसं यश, अपयश मिळतं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. शेवटी दोघांचे घरातले भेटल्यानंतर झालेल्या चर्चेनंतर आई थोडीशी convience झाली."

दरम्यान, समीर आठल्ये यांच्याशी लग्न केल्यानंतरही अलका कुबल यांचा फिल्मी प्रवास सुरु राहिला. यात समीर यांनी त्यांची खूप साथ दिली. असका कुबल यांनी आता त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे.

Web Title: maherchi sadi fame marathi-actress-alka-kubal- and sameer athlaye filmy-lovestory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.