हे पाहा, राधिका आपटे काय म्हणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:57 IST2017-02-04T11:27:20+5:302017-02-04T16:57:20+5:30
आपल्या अभिनयाने अभिनेत्री राधिका आपटे हिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेत. तसेच ती चित्रपटसृष्टीच्या बोल्ड आणि हॉट चर्चेत ...

हे पाहा, राधिका आपटे काय म्हणते?
आ ल्या अभिनयाने अभिनेत्री राधिका आपटे हिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेत. तसेच ती चित्रपटसृष्टीच्या बोल्ड आणि हॉट चर्चेत नेहमीच राहिली असल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच तिचा पार्च्ड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या या नग्न सीन्सविषयी खूपच चर्चा झाली होती. नुकतेच तिला या नग्न सीन्सविषयी विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, आपल्या देशात लोकांसाठी चित्रपट म्हणजे मोठी गोष्ट आहे, ते यासाठी भावनिक असतात. पार्च्डमधील नग्न सीनबद्दल काय घडले हे मला चांगले माहिती आहे. जे स्त्री आणि पुरुष याच्याशी जोडले गेले ते विवस्त्रतेच्या पलिकडे जाऊन विचार करणारे होते. आपला प्रेक्षक अपरिपक्व आहे असे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे जर कथेची गरज असेल तर नग्न सीन्सचे समर्थन होऊ शकते. हेतु चांगला असायला हवा. परंतु मनोरंजनाच्या नावाखाली महिला नग्न होऊन नाचतात ते योग्य नाही असेदेखील यावेळी राधिका म्हणाली. ही अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजात बोलत असते. तिला वादग्रस्त प्रकरणात अडकण्याची भिती नसते. ती रोखठोक आणि मनमोकळेपणाने बोलत असते. राधिका हिने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. तिचा लय भारी हा मराठी चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात ती अभिनेता रितेश देशमुख, शरद केळकर यांच्यासोबत पाहायला मिळाली. त्याचबरोबर ती हंटर या बॉलिवुड चित्रपटातदेखील झळकली होती. या चित्रपटात ती अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत पाहायला मिळाली. यावेळी या दोन मराठीमोळी अभिनेत्रींची चर्चा खूपच रंगली होती.