पाहा, गौरव घाटणेकरचा आवडता छंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2017 07:18 AM2017-02-05T07:18:44+5:302017-02-05T12:48:44+5:30

प्रत्येक व्यक्तीचा आपला एक आवडता छंद असतो. ती व्यक्ती तो छंद लहानपणापासून जपत आली असते. मात्र करियरच्या मार्गात काही ...

Look, the favorite hobby of glory | पाहा, गौरव घाटणेकरचा आवडता छंद

पाहा, गौरव घाटणेकरचा आवडता छंद

googlenewsNext
रत्येक व्यक्तीचा आपला एक आवडता छंद असतो. ती व्यक्ती तो छंद लहानपणापासून जपत आली असते. मात्र करियरच्या मार्गात काही व्यक्ती छंद आणि करियर दोन्ही जोपासत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामाच्या व्यापातून छंदच त्या व्यक्तींना आनंद देत असतात असेच काहीसे अभिनेता गौरव घाटणेकर याच्या बाबतीत घडले असल्याचे पाहायला मिळत आहे.
       
      हो, कारण गौरवने नुकतेच सोशलमीडियावर घोडेस्वारी करतानाचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. त्याचबरोबर महाविदयालयात असताना घोडेस्वारीचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते आणि तेव्हाच तो माझा छंद बनला असल्याचे त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहेत. मात्र गौरव आता ही घोडेस्वारी कोणत्या आगामी चित्रपटासाठी करत आहे का हे अदयापदेखील कळाले नाही. सध्या तो बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्राची निर्मिती असलेल्या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. का रे रास्कला असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नविन चेहरा पाहायला मिळणार आहे. 
         
         गौरव घाटणेकर यापूर्वी तुझविन सख्या रे मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. या मालिकेतील त्याची आणि कादंबरी कदमची जोडी हिट झाली होती. त्याची ही मालिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली होती. त्याचबरोबर तो सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटातदेखील पाहायला मिळाला होता. नुकतेच तो मराठी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री श्रुती मराठेसोबत लग्नबंधनात अडकला आहे. या दोघांची ही जोडी प्रेक्षकांना ही खूपच भावली आहे. 




Web Title: Look, the favorite hobby of glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.