On Location Pic:'तु तिथे असावे' नवीन मराठी सिनेमातील कलाकारांचा शूटिंग दरम्यान असा असतो अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:37 AM2017-11-30T10:37:51+5:302017-11-30T16:07:51+5:30

नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा एक नवा कोरा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

On Location Pic: 'You should be there' | On Location Pic:'तु तिथे असावे' नवीन मराठी सिनेमातील कलाकारांचा शूटिंग दरम्यान असा असतो अंदाज

On Location Pic:'तु तिथे असावे' नवीन मराठी सिनेमातील कलाकारांचा शूटिंग दरम्यान असा असतो अंदाज

googlenewsNext
त्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा एक नवा कोरा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'तू तिथे असावे' असे या सिनेमाचे नाव आहे.संतोष गायकवाड सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकतेच या सिनेमाचा शूटिंगचा पहिला भाग चित्रीत करण्यात आला. नागपुर येथे या सिनेमाचे काही भागांचे चित्रिकरण करण्यात आले. शूटिंग दरम्यानचे काही फोटो ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर यांनी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत कलाकारांचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे. एकीकडे सीन कशा प्रकारे शूट झाला याची माहिती घेताना भूषण प्रधान एका फोटोत दिसतोय तर दुस-या फोटोत भुषण आणि जयवंत वाडकर दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन करताना दिसतायेत.या सिनेमात भुषण प्रधानसह पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या ऑनलोकेश सिनेमाचे शूटिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये कलाकार मिळालेल्या वेळेत मस्त मजा मस्तीही करताना दिसतायेत. एकुणच सगळे कलाकारमंडळी शूटिंग दरम्यान त्यांच्या गावच्या आठवणींनाही उजाळा देताना दिसतायेत.





2018मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.सिनेमाचा विषय आणि त्यातले गांभिर्य कुठेही तडा जाणार नाही अशा प्रकारे कलाकारांनीही खूप मेहनत घेतली आहे.भुषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघे तू तिथे असावे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे रूपेरी पडद्यावर एक फ्रेश जोडीलची लव्हस्टोरी पाहणे रसिकांसाठी एका वेगळा अनुभव देणार ठरणार यांत काही शंका नाही.जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील आहेत. तर सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.भूषण प्रधान रुपेरी पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.संस्कृती या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेमुळे भुषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 

Web Title: On Location Pic: 'You should be there'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.