लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीने सांगितले तिच्या सुखी आयुष्याचं कारण, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Updated: October 5, 2020 19:32 IST2020-10-05T19:31:31+5:302020-10-05T19:32:39+5:30

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

Laxmikant Berde's daughter swanandi told about the reason for her happy life | लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीने सांगितले तिच्या सुखी आयुष्याचं कारण, जाणून घ्या याबद्दल

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीने सांगितले तिच्या सुखी आयुष्याचं कारण, जाणून घ्या याबद्दल

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या सुखी आयुष्याचे कारण सांगितले आहे.

स्वानंदी बेर्डेने आईसोबत म्हणजेय प्रिया बेर्डे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, माझ्या सुखी आयुष्याचं कारण.

खरेतर स्वानंदीने हा फोटो कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका सुखी माणसाचा सदराच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदेने दिलेल्या मायलेक चँलेज स्वीकारत शेअर केला आहे. ही नवीन मालिका येत्या २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.

स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

Web Title: Laxmikant Berde's daughter swanandi told about the reason for her happy life