लक्ष्मीकांत बेर्डेचा आज स्मृतीदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 12:50 IST2016-12-16T12:26:32+5:302016-12-16T12:50:27+5:30

मराठी चित्रपटसृष्ट्रीतील विनोदाचा बादशाहा असणारा लक्ष्मीकांत बेर्डे याचा आज स्मृतीदिन. लक्ष्याने नेहमीच आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. ...

Laxmikant Barde's Today Smriti Day | लक्ष्मीकांत बेर्डेचा आज स्मृतीदिन

लक्ष्मीकांत बेर्डेचा आज स्मृतीदिन

ाठी चित्रपटसृष्ट्रीतील विनोदाचा बादशाहा असणारा लक्ष्मीकांत बेर्डे याचा आज स्मृतीदिन. लक्ष्याने नेहमीच आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. प्रेक्षकांच्या हा लाडका कलाकार आज आपल्यात नसून तब्बल बारा वर्षे झाली आहेत. तरी ही आज लक्ष्मीकांतच्या आठवणी ताज्या आहेत. या बारा वर्षात मराठी चित्रपटसृष्ट्री आज खूप पुढे गेली आहे. मात्र लक्ष्याच्या आठवणी सर्वाच्या मनात तशाच आहेत. लक्ष्याचे बालपण हे गिरगावातील कुंभारवाडयात गेले आहे. तर त्याचे शिक्षण त्याने युनियन हायस्कूलमध्ये पूर्ण केले आहे. या हायस्कूल आणि चौपाटी येथील भवन्स कॉलेजमध्ये लक्ष्मीकांत उत्साहाने एकांकिकामध्ये सहभाग घ्यायचा.  साहित्य संघ मंदिरात तो बॅक स्टेजवर धडपडायचा .त्याच्या या मेहनतीला टर्निग पाइंट मिळाला तो म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेचे टूरटूर नाटक.



  महेश कोठारे यांच्या १९८५ साली प्रदर्शित झालेल्या धुमधडाका या चित्रपटाने लक्ष्याच्या करिअरला चार चाँदच लावले. नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमातून त्याने आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. लक्ष्याच्या बाबतीत आणखी एक सांगावेसे वाटते की, नाटकात प्रेक्षकांपर्यंत थेट पोहचता यावे म्हणून त्याने कार्टी उडाली भुर्र हे नाटक स्वीकारले.



 मैने प्यार किया या चित्रपटाने त्याने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. हम आपके कौन है या बॉलिवूडच्या लोकप्रि़य चित्रपटात लक्ष्याने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली. तर मराठीत चित्रपटसृष्ट्रीत दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, धडाकेबाज, हमाल दे धमाल, रंगत संगत, पटली रे पटली अशी एक से एक सुपरहीट मराठी चित्रपट त्याने केले आहेत.  



१९९२ मध्ये तो डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक चित्रपटापर्यंत पोहचला हा त्याच्या कारकीदीर्तील हा खूपच महत्त्वाचा टप्पा होता. त्याच्यासोबत जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळाली.

 

लक्ष्याने अभिनेत्री प्रिया अरुणसोबत संसार थाटल्यावर अभिनय व स्वानंदी या दोन मुलाना जन्म दिला. तसेच लक्ष्मीकांतचा हा  अभिनयदेखील आता चित्रपटसृष्ट्रीत येण्यास सज्ज झाला आहे. तो सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे

Web Title: Laxmikant Barde's Today Smriti Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.