लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा झळकणार चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 11:41 IST2016-05-26T06:11:47+5:302016-05-26T11:41:47+5:30
मराठी इंडस्ट्रीचा जान असणारा व प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा रूपरी ...

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा झळकणार चित्रपटात
राठी इंडस्ट्रीचा जान असणारा व प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा रूपरी पदडयावर झळकणार आहे. लक्ष्याने नेहमीच आपल्या प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसविल आहे. यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच, लक्ष्याची मुले काय करत असतील? ती वडिलानंतर चित्रपटात झळकणार आहेत का? अशा अनेक प्रश्नात प्रेक्षक अडकून होता. आता, हीच उत्सुकता त्यांची संपली आहे. कारण ज्युनिअर लक्ष्या म्हणजेच अभिनय बेर्डे हा लिटल चॅम्प आर्या आंबेकर हिच्यासोबत रूपेरी पडदयावर झळकण्यास सज्ज झाला आहे. आर्या ही आता अभिनयसोबत चित्रपटात पदापर्ण करत आहे. सध्या या चित्रपटाचे नाव टीएसएसके ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करत आहे.