लता मंगेशकर आणि अशा भोसले दोन अनमोल रत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:19 IST2017-09-18T11:49:28+5:302017-09-18T17:19:28+5:30

 भारतीय संगीतावर मा. दिनानाथ मंगेशकर आणि त्यांची पाच रत्ने यांची अमीट छाप आहे. भावसंगीत, नाट्यसंगीत,पार्शवगायन या क्षेत्रात मंगेशकर भावंडांनी ...

Lata Mangeshkar and Bhosle, such as two priceless gems | लता मंगेशकर आणि अशा भोसले दोन अनमोल रत्न

लता मंगेशकर आणि अशा भोसले दोन अनमोल रत्न

 
ारतीय संगीतावर मा. दिनानाथ मंगेशकर आणि त्यांची पाच रत्ने यांची अमीट छाप आहे. भावसंगीत, नाट्यसंगीत,पार्शवगायन या क्षेत्रात मंगेशकर भावंडांनी स्वर  विहार केला आहे. १९४७ नंतर मराठी हिंदी सिनेमा च्या दुनियेत लता मंगेशकर आणि अशा भोसले यांनी आपल्या अमृत स्वरांनी एक नवीन पर्व सुरू केले. त्याचबरोबर संतरचना, भावसंगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत अश्या अनेक संगीत प्रकारात  या भगिनींच्या स्वरांनी अत्युच्च शिखर गाठले. याच सुरेल कारकिर्दीचा मागोवा घेणार कार्यक्रम लताशा  तरुण पिढीतील  युवा गायिका आणि पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिच्या सांगीतिक चिंतनातून हा कार्यक्रम  साकार झाला आहे.  मा. दीनानाथ , डॉ वसंतराव देशपांडे , पं. कुमार गंधर्व यांच्या शास्त्रीय संगीताचा  वारसा जप्त असतानाच  सावनीला  भारतरत्न लता मंगेशकर पद्मभूषण, पद्मश्री भावगंधर्व, पं हृदयनाथ मंगेशकर यांचा सहवास लाभला यातूनच ह्या कार्यक्रमाची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले आहे. सावनी बरोबरच तरुणपिढीतील कुशल सहागायक आणि वाद्यवादक या कार्यक्रमात सहभागी होतात. तरुण पिढीच्या समर्थ स्वरातून संगीत श्रुष्टीचे गौरी-शंकर असलेल्या लता- आशा यांना स्वरवंदना देताना प्रत्येक कलाकारांना धन्यता वाटते.  
लता आणि अशा ह्यांची कारकीर्द एका कार्यक्रमात मावणारी नाही तरीही ह्या कार्यक्रमात गेल्या ७० वर्षांच्या काळातील महत्त्वाची मराठी गाणी, त्या गाण्यांना संगीत दिलेल्या दिग्गज संगीतकार, गितकारांची गाजलेली गाणी, विविध संगीत प्रकार ह्यांना न्याय देणारी रचना आहे. या कार्यक्रमात लेखक प्रवीण जोशी लिखित सहितेतून (स्क्रिप्ट) लता आणि आशा ह्यांचा सुरेल प्रवास उलगडत जातो. लता आणि अशा ही संगीत जगाला लाभलेली दोन अनमोल रत्न आहेत. त्यांनी नाव गाण्याच्या माध्यमातून भारताचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवले आहे. आजही रिअॅलिटी शोमध्ये लता दीदी आणि आशाताई यांचीच गाणी स्पर्धक गाताना दिसतात.  

Web Title: Lata Mangeshkar and Bhosle, such as two priceless gems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.