'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:53 IST2025-10-20T16:52:41+5:302025-10-20T16:53:14+5:30
आधी 'आरपार' आणि आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा सर्वांना प्रेमात पाडणार आहे.

'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..."
मराठीतील स्टार अभिनेता ललित प्रभाकर 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. आदित्य देसाई ही त्याची भूमिका आजही तरुणींना प्रेमात पडते. रोमँटिक हिरो, चॉकलेट हिरो अशीच आता त्याची प्रतिमा बनली आहे. नुकताच तो 'आरपार' सिनेमात हृता दुर्गुळेसोबत रोमान्स करताना दिसला. तर आता आगामी 'प्रेमाची गोष्ट २'मध्ये तो २ अभिनेत्रींसोबत रोमान्स करत आहे. त्याच्या या रोमँटिक हिरो इमेजवर त्याने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत ललित प्रभाकर म्हणाला, "रोमँटिक फिल्म्स बघूनच मी मोठा झालो आहे. माझ्यावर आधीपासूनच रोमँटिक फिल्म्सचा जास्त पगडा आहे. छान रोमँटिक फिल्म्स करायच्या हे माझ्या मनात नेहमीच होतं. लक्षात राहणारे, लोकांच्या मनावर छाप सोडणारे रोमँटिक कॅरेक्टर्स मला करायचे होते. जसं की आदित्य देसाई ची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तेही रोमँटिकच कॅरेक्टर होतं. हेच मला सिनेमांमध्येही हवं होतं. तर प्रेमाची गोष्ट २ सारखी संधी अजून कोणतीही असूच शकत नव्हती. सतीश राजवाडे सर जे रोमँटिक सिनेमांचे बादशाह आहेत. ते जर प्रेमावरचा सिनेमा घेऊन येत आहेत आणि त्यात ते मला हिरो म्हणून घेत आहेत तर नक्कीच ही माझ्यासाठी चांगली संधी होती."
ललित प्रभाकरच्या अनेक तरुणी चाहत्या आहेत. दिवसेंदिवस तो आणखी गुडलुकिंग आणि चार्मिंग दिसत आहे. आधी 'आरपार' आणि आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा सर्वांना प्रेमात पाडणार आहे. ललित आणि प्राजक्ता माळीची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि आजही आवडते. काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये ललित प्रमोशनसाठी आला असता पुन्हा एकदा ललित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.