'दिग्दर्शकासमोर ब्रँडेड... ' नवा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, कुशलने थेट लंडनमधून शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:49 PM2023-04-04T15:49:12+5:302023-04-04T15:53:04+5:30

दिग्दर्शकासमोर ब्रँडेड शूज, एकदम ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वॉच घालून जा आणि परफ्युम लाव.

Kushal badrike shared the video directly from London what needs to be done to get a new project | 'दिग्दर्शकासमोर ब्रँडेड... ' नवा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, कुशलने थेट लंडनमधून शेअर केला Video

'दिग्दर्शकासमोर ब्रँडेड... ' नवा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, कुशलने थेट लंडनमधून शेअर केला Video

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या लंडनमध्ये आहे. दिग्दर्शक संजय जाधवच्या (Sanjay Jadhav) आगामी प्रोजेक्टमध्ये अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे. कुशलसोबतच प्रार्थना बेहरे, शिवानी सुर्वे, अभिनय बेर्डे आणि संजय नार्वेकर यांची सध्या नावं समोर आली आहेत. ही कलाकार मंडळी रोड लंडनमधून काही विनोदी संभाषण पोस्ट करत असतात. नुकताच कुशलने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात संजय जाधन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे समजावत आहेत. मात्र नंतर संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) येऊन एकाच शब्दात त्यांना गप्प करतात. 

व्हिडिओच्या सुरुवातीला दिग्दर्शक संजय जाधव हे प्रार्थना आणि कुशलसोबत गप्पा मारत असतात. यामध्ये संजय जाधव कुशलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात,'एखादा प्रोजेक्ट हातातून जाऊ नये म्हणून काय करायचं तर दिग्दर्शकासमोर ब्रँडेड शूज, एकदम ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वॉच घालून जा आणि परफ्युम लाव, मग बघ दिग्दर्शकाला तुम्हीच त्याच्या सिनेमाचे हिरो असं वाटायला थोडाही वेळ लागणार नाही.'
प्रार्थना आणि कुशल संजय जाधव यांचा सल्ला मन लावून ऐकत असतात तेवढ्यात तिथे संजय नार्वेकर येतात आणि विचारतात,'काय चाललंय?' तर यावर कुशल बद्रिके म्हणतो सर सांगत आहेत की नवीन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काय करावं लागतं. तर यावर संजय नार्वेकर फक्त एका वाक्यात उत्तर देतात. ते म्हणतात, 'उत्तम अभिनय'. नंतर संजय जाधव तिथून काढता पाय घेतात तर कुशल आणि प्रार्थनाचे चेहरे बघण्यालायक होतात. 

सध्या लंडनमध्ये सुरु असलेल्या या प्रोजेक्टबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. मात्र कलाकार रोज पोस्ट करत असलेले हे विनोदी व्हिडिओ चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. 

Web Title: Kushal badrike shared the video directly from London what needs to be done to get a new project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.