​जाणुन घ्या कोण आहे तेजश्री प्रधानचं क्रश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:51 IST2016-12-20T11:50:18+5:302016-12-21T16:51:48+5:30

अनेक सेलिब्रिटीज हे सर्वसामान्यांचे क्रश असतात हे तर आपल्याला माहितीय. परंतू या कलाकारांचे देखील कोणीतरी क्रश असू शकते असा ...

Know who is Tejashree Pradhan's crush? | ​जाणुन घ्या कोण आहे तेजश्री प्रधानचं क्रश?

​जाणुन घ्या कोण आहे तेजश्री प्रधानचं क्रश?

ेक सेलिब्रिटीज हे सर्वसामान्यांचे क्रश असतात हे तर आपल्याला माहितीय. परंतू या कलाकारांचे देखील कोणीतरी क्रश असू शकते असा तुम्ही कधी विचार केलाय का. मालिका, चित्रपट आणि रंगभूमी गाजविलेली मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानचे देखील असेच एक क्रश आहे. या क्रशचा उलगडा नुकताच तिने एका मुलाखतीत केला आहे. तेजश्री सांगतेय,  आॅस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली हा माझं वन अ‍ॅण्ड ओन्ली क्रश आहे. मला लहानपणापासून ब्रेट ली खूप आवडतो. ज्या व्यक्ती मला ओळखतात त्या सर्वांना माहितीये मला लहानपणापासून ब्रेट ली आवडतो. भूगोलाच्या तासाला आॅस्ट्रेलिया या देशाचं नुसतं नाव जरी आलं तरीपण साधारण पूर्ण वर्ग माज्याकडे बघायचा. इतकं माझं ब्रेट लीवर क्रश होतं. माज्या शाळेतले सगळेजण मला वृत्तपत्रात आलेले ब्रेट लीचे फोटो आणून द्यायची. आता मुलं जसं करतात, मी साकारलेल्या जान्हवीच्या छायाचित्रांची एखादी कात्रणाची वही माज्या हातात येते तेव्हा मला कायम आठवतं की हे मीसुद्धा केलयं. त्यामुळे मला त्याची किंमत असते. मी ब्रेट लीचे छोटे-छोटे फोटो काढून एका वहित चिकटवून ती वही जपून ठेवली होती. २०१३ साली भारत-आॅस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघामध्ये वर्ल्डकप झाला होता. त्यात आॅस्ट्रेलिया जिंकली होती. भारत हरल्यामुळे घरी बाबा खूप निराश झाले होते. काय भारत मॅच हरला ? असं ते बोलत होते. तितक्यात माज्या एका मित्राने अगदी उत्साहात घरी फोन केला आणि मी आहे का वगैरे विचारलं. पुढे त्याने सांगितलं की, तिचा ब्रेट ली जिंकला ना म्हणून फोन केला. त्यानंतर बाबा त्याला आणि मला इतके ओरडले ना.. तुम्हाला काही वाटतं का.. आपला देश हरला.. तर तो म्हणाला ते झालंच. पण तिला ब्रेट ली आवडतो म्हणून फोन केला. तेव्हा बाबा खूप चिडले होते, तर अशी ही एक आठवण आहे. 

Web Title: Know who is Tejashree Pradhan's crush?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.