'बाईपण भारी देवा' आता पाहा टीव्हीवर! कधी आणि कुठे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:31 PM2024-04-29T16:31:00+5:302024-04-29T16:31:34+5:30

'बाईपण भारी देवा'ने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता पहिल्यांदाच हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाणार आहे. 

kedar shinde movie baipan bhari deva world tv premier on 19 may star pravah | 'बाईपण भारी देवा' आता पाहा टीव्हीवर! कधी आणि कुठे? जाणून घ्या

'बाईपण भारी देवा' आता पाहा टीव्हीवर! कधी आणि कुठे? जाणून घ्या

'बाईपण भारी देवा' सिनेमाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्याबरोबरच 'बाईपण भारी देवा'ने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता पहिल्यांदाच हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाणार आहे. 

केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटातून सहा बहिणींची कथा दाखविण्यात आली होती. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या सिनेमातून दाखविण्यात आलं होतं. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर केदार शिंदेंच्या या सिनेमाचं वर्ल्ड टीव्ही प्रिमियर होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर हा सिनेमा दाखवला जाणार आहे. १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, "सकस मनोरंजन, सर्वांना भावणारा आशय ही स्टार प्रवाहची ताकद आहे. रसिकांना दर्जेदार मालिका आणि चित्रपट देण्याच्या हेतूने 'बाईपण भारी देवा'सारखा सुपरहिट चित्रपट स्टार प्रवाहवर सादर होतोय. आपल्या परंपरेला जोडून मांडलेला हा चित्रपट एक यशस्वी आणि मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहवर येतोय याचा आनंद आहे."

Web Title: kedar shinde movie baipan bhari deva world tv premier on 19 may star pravah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.