केदार शिंदे यांनी घेतली कार्टून प्रकरणात उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:44 IST2016-12-05T12:44:36+5:302016-12-05T12:44:36+5:30
सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण हे कार्टूनने रंगलेले दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कार्टून या राजकीय वादात दिग्दर्शक केदार शिंदे ...
.jpg)
केदार शिंदे यांनी घेतली कार्टून प्रकरणात उडी
ध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण हे कार्टूनने रंगलेले दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कार्टून या राजकीय वादात दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील उडी मारली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिताचं कार्टून झालं आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यालाच मुख्यमंत्र्यांनी त्याच शब्दात उत्तर देत ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत हर जगह फूल खिला है म्हणून त्यांचा मोगली झाला आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लावला आहे. अशा या राजकीय कार्टून वादावर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतेच ट्वििट केले की, डोरेमॉन आणि मोगलीच्या राज्यात आमचा कधीच या लोकांनी डोनल्ड डक करून ठेवलाय!!!! असे म्हणत त्यांनी कोणत्याही पक्षाची बाजू न मांडता थेट सामान्य माणसाच्या परिस्थितीवर आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले दिसत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र दिग्दर्शक केदार शिंदे हे सामाजिक असो या राजकीय कोणत्याही विषयावर आपले मत बिनधास्त सोशल मीडियावर व्यक्त करताना पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे ट्विीटर अकाऊंट हॅक झाले आहे. यावर ही त्यांनी ठोकपणे सोशल मीडियावर म्हटले की, गेली सत्तर वर्ष आमचे अकाऊंट हॅक होत आहे. त्याच्याबद्दल काहीच नाही. म्हणून अशा पध्दतीने एक दिग्दर्शक ज्यावेळी राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करतात त्यावेळी त्यांचे हे मतदेखील चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडतात. शेवटी एक दिग्दर्शक नेहमीच समाजाचे प्रतिबिंब आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करत असतात.दिग्दर्शक यांनी केदार शिंदे यांनी मराठी चित्रपटसृष्ट्रीला जत्रा, अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामादेर पंत, खो खो असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.