/> मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाºया अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. काल प्रदर्शित झालेल्या कौल मनाचा या चित्रपटालाही प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. रेड बेरी एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित कौल मनाचा चित्रपटाला सर्वत्र दमदार ओपनिंग मिळाले आहे. किशोरवयीन मुलांना घडवताना पालक, शिक्षक व समाजातील इतर घटकांचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण असतो. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यातील संवाद हरवत चालला आहे. या हरवलेल्या संवादामुळे आज पालक व मुलांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे. किशोरवयीन वय हे जिज्ञासाचे अधिक असते. या वयात अनेक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मुलांना मिळाली नाहीत. तर आपल्या परीने त्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न मुलांकडून केला जातो. अनेकदा हा वेध चुकी च्या मार्गाने घेतला जातो. मुलांची मानसिक घालमेल लक्षात घेऊन योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न करणारा भिमराव मुडे दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे पालकांच्या डोळ्यात घातलेलं एक झणझणीत अंजनच म्हणावं लागेल.
सिनेमा माध्यमाने भारावलेल्या राज कुंडल या मुलाची कथा यात मांडली आहे. विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका यात आहेत.
किशोरवयीन मुले ही अतिशय चंचल असतात. या वयात त्यांच्यामध्ये अनेक बदल घडत असतात या बदलांकडे पालकांनी वेळीच लक्ष देत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे गरजेचे असते. पालक व मुलांच्या नात्यात हा मोकळेपणा नसेल तर काय घडू शकतं ? यावर भाष्य करणारा कौल मनाचा हा चित्रपट वास्तवाची जाणीव करून अंतर्मुख करत असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Web Title: Kaul Mana's movie will appeal to audience favorites
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.