​तांत्रिक पुरस्कारात ‘कट्यार काळजात घुसली’ अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 20:49 IST2016-04-15T15:19:24+5:302016-04-15T20:49:24+5:30

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्ताने ३० एप्रिल रोजी प्रदान करण्यार येणाऱ्या पुरस्कारांची नामांकने ...

Katiyar Kaljat Ghusali tops the Tantric award | ​तांत्रिक पुरस्कारात ‘कट्यार काळजात घुसली’ अव्वल

​तांत्रिक पुरस्कारात ‘कट्यार काळजात घुसली’ अव्वल

ाराष्ट्र राज्य शासनातर्फे मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्ताने ३० एप्रिल रोजी प्रदान करण्यार येणाऱ्या पुरस्कारांची नामांकने सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच घोषित केली. 

उत्कृष्ट चित्रपटांसाठी १० चित्रपटांची तर वैयक्तिक पुरस्कारासाठी ३ नामांकने जाहीर करण्यात आली  आहेत. काही तांत्रिक पुरस्कारही घोषित करण्यात आले आहेत. त्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ३० एप्रिल रोजी समारंभप्रसंगी नाकांकनांमधून अंतिमत: निवडलेले पुरस्कार जाहिर केले जातील. 

उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीसाठी ज्या १० चित्रपटांची नामांकने जाहीर करण्यात येत आहेत, ती अशी...कट्यार काळजात घुसली, दि सायलेंस, दगडी चाळ, बायोस्कोप, डबलसीट, नटसम्राट, हलाल, रिंगण, रंगा पतंगा आणि हायवे. 
तांत्रिक पुरस्कारांमध्ये मात्र ‘कट्यार.....’ने बाजी मारत अव्वल स्थान गाठले आहे. 

Web Title: Katiyar Kaljat Ghusali tops the Tantric award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.