'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत ऋषभ शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला- "मी चित्रपट पाहिला नाही पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:36 IST2025-10-07T15:35:37+5:302025-10-07T15:36:07+5:30
'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत आता ऋषभ शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.

'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत ऋषभ शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला- "मी चित्रपट पाहिला नाही पण..."
'दशावतार' या सिनेमानंतर प्रेक्षक 'कांतारा चॅप्टर १'सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. 'दशावतार' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची 'कांतारा'शी तुलना होत होती. हे दोनही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यातून परंपरा आणि लोककलेवर भाष्य करण्यात आलं आहे. 'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत आता ऋषभ शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.
'ईटाइम्स'शी बोलताना ऋषभ शेट्टीने 'दशावतार' सिनेमाबाबत वक्तव्य केलं. तो म्हणाला, "मी या सिनेमाबाबत खूप ऐकलं आहे. त्याचं कौतुकही होत आहे. पण, कांताराचं प्रमोशन उशीरा सुरू झाल्यामुळे मला सिनेमा बघायला वेळ मिळाला नाही. मी नक्कीच हा सिनेमा बघेन. आपली परंपरा, वनसंवर्धन याबद्दल सिनेमे बनत आहेत ही चांगली गोष्ट आहे. असे चित्रपट लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत. हे सिनेमे मनोरंजन करण्यासोबतच विचार करण्यास भाग पाडतात. त्यासोबत पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज असतात".
दरम्यान, 'दशावतार' सिनेमाचं दिग्दर्शन सुबोध खानोकलकर यांनी केलं असून सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, भरत जाधव, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर 'कांतारा चॅप्टर १'चं लेखन-दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. अवघ्या चारच दिवसांत सिनेमाने जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे.